NCP Leader On Sharad Pawar : अजितदादांचा आमदार म्हणतो, माझी छाती फाडली तरीही फक्त पवार साहेबच...
Narhari Zirwal News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांची ४० आमदारांनी साथ सोडली होती. मात्र आजही अजित पवार यांच्यासह इतर सर्व नेते शरद पवार आमचे विठ्ठल असल्याचे आजही सांगत असतात. अशावेळी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने शरद पवार यांच्याविषयी आपली निष्ठा व्यक्त केली आहे. त्यांनी शरद पवार आमचे पांडुरंग असून आमची त्यांच्यासाठी निष्ठा असल्याचे म्हटले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगळ्या चर्चांना उत आला आहे.
माझ्या छातीत फक्त साहेबच...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आधीमधी दोन्ही गटातील नेते काहीना काही कारणाने चर्चेत असतात. आताही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करताना ते आमचे पांडुरंग असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच झिरवाळ यांनी बजरंगाच्या छातीत जसे प्रभू श्री राम दिसतील. तसेच माझ्या छातीत शरद पवार साहेबच दिसतील, असे वक्तव्य केलं आहे.
पांडुरंगाला साकडं
यावेळी झिरवाळ यांनी आपण निवडूण आल्यानंतर किंवा मंत्री झाल्यानंतर शरद पवार यांची भेट घेतलेली नाही. पण आता त्यांची भेट घेणार असून त्यांच्यासमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आज नववर्षा निमित्त पंढरपूर येथे विठुरायाची पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी त्यांनी, पवार कुटुंबांमधील वाद संपून पुन्हा सर्व पवार कुटुंब एकत्र यावे, असे साकडं पांडुरंगाला घातलं.
माझीही तीच मागणी
यावर देखील झिरवाळ यांनी, प्रतिक्रिया देताना, माझी देखील तीच मागणी आहे. माझीच काय विरोधक असो की राष्ट्रवादीचा कुणीही सगळ्यांना वाटतंय की अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र यावेत. आता खूप गोष्टी घडून गेल्या आहेत. लोकांनी आम्हाला पुन्हा एकदा निवडून दिल्याचेही झिरवाळ यांनी म्हटले आहे.
अनेकांचं अवघड झालंय
ज्या पद्धतीने अजितदादांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पांडुरंगाला साकडं घातलं घातलं आहे. त्याचप्रकारे माझीही पांडुरंगाला विनंती आहे. आता दोन्ही पवार एकत्र आले पाहिजेत. मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. याआधीदेखील माझ्यावर पहाटे शपथ विधीवेळी दिल्लीला पळून गेल्याची टीका झाली होती. पण मी साहेबांना नाही सोडलो. ज्याप्रमाणे बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले. माझीही छाती फाडली तर फक्त साहेबच दिसतील.
तर ज्या दिवसापासून अजित पवार यांच्यासोबत गेलो तेंव्हा पासून शरद पवार यांच्यासमोर गेलेलो नाही. जाणार ही कसा आणि कोणत्या तोंडाने तोंडाने साहेबांपुढे जाऊ? अशी खंत झिरवाळ यांनी व्यक्त केली आहे. तर प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन मी साहेबांना फसवलं. हा निर्णय घ्यायला मला भाग पडलं. पण आता साहेबांच्या समोर जाणार, लोटांगण घालून पाया पडणार. आमच्या सारख्या अनेकांचं अवघड झाल आहे. कदाचित ते याचा विचार करतील असंही झिरवाळ यांनी म्हटल आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

