Narhari Zirwal : अशीही गुरुदक्षिणा!मंत्रिपदाची शपथ घेताच झिरवाळांनी दिला 'जय श्रीराम' चा नारा

Narhari Zhirwal Political Guru Shriram Shete : 'मला मंत्रिपदाची संधी मिळत आहे, तुम्ही शपथविधीला या..'अशी विनंती केली होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील शेटे हे झिरवाळ यांच्या शपथविधीला उपस्थित होते.
Narhari Zirwal | Shriram Shete
Narhari Zirwal | Shriram SheteSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदासाठी पहिला फोन पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांना गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झिरवाळ यांना फोन केला होता.

झिरवाळ यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचे कुटुंब या शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. पण यात एका व्यक्तीची उपस्थिती मात्र लक्ष वेधून ठरली ती म्हणजे झिरवाळांचे राजकीय गुरु श्रीराम शेटे यांची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शेटे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत.

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत झिरवाळ यांनी 'श्रीराम शेटे माझे गुरू' असा उल्लेख केला होता. ते विधानसभेचे उपाध्यक्ष झाले तेव्हा ही शेटे यांचा 'मार्गदर्शक गुरू' असा उल्लेख केला होता.

Narhari Zirwal | Shriram Shete
Maharashtra Assembly Winter Session: हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, विरोधक सत्ताधाऱ्यांना 'या' मुद्दांवरुन घेरणार

झिरवाळ यांनी शपथविधीसाठी सुनील तटकरे यांनी फोन केला तेव्हा फोन येताच त्यांनी आपले गुरू श्रीराम शेटे यांना फोन करीत 'मला मंत्रिपदाची संधी मिळत आहे, तुम्ही शपथविधीला या..'अशी विनंती केली होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील शेटे हे झिरवाळ यांच्या शपथविधीला उपस्थित होते. त्यांनी आपल्या शिष्याला शुभेच्छा दिल्या.

"राज्याची जी जबाबदारी मिळेल. त्या माध्यमातून जनतेचे कामे अजून जोमाने करा. आता तुमच्यावर केवळ दिंडोरीचे नाही तर राज्याची जबाबदारी आहे," असे सांगत 'अजून मोठे व्हा' असा आशीर्वाद दिला. झिरवाळ मंत्रिपदाची शपथ पूर्ण केल्यानंतर 'जय श्रीराम' चा नारा देत गुरूला गुरू दक्षिण दिली अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

Narhari Zirwal | Shriram Shete
Meghana Bardikar: पती IPS अधिकारी, वडील पाच वेळा आमदार; मंत्री मेघना बोर्डीकर कोण आहेत?

नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या सोबत राहिले. झिरवाळ हे वारंवार शेटे हे माझे सोबत नसले तरी ते माझे दैवत आहे व त्यांचा दुरून आशीर्वाद असल्याचे सांगतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीराम शेटे यांनी सुनीता चारोस्कर यांचा प्रचार केला मात्र त्यांनी झिरवाळ यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com