Igatpuri Politics : युती-आघाडीमुळे उमेदवारांची कोंडी; विधानसभेसाठी शह-काटशहाचं राजकारण

Assembly Election 2024 : इगतपुरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस उमेदवारांची अस्तित्वाची लढाई
Hiraman Khoskar, Nirmala Gavit
Hiraman Khoskar, Nirmala GavitSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News :

सर्व राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अजून लोकसभेच्या जागांचं वाटप ना महायुतीनं जाहीर केलंय ना महाविकास आघाडीने. त्याचवेळी सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी पेरणीदेखील सुरू केल्याचे दिसते.

अशातच इगतपुरी विधानसभा मतदारसंघात (Igatpuri Assembly constituency) ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) यांची पंचाईत झाल्याचे आणि काँग्रेसचे हिरामण खोसकरांना (Hiraman Khoskar) काँग्रेसच्याच काही जणांकडून छुपा अथवा उघड विरोध असल्याचे चित्र आहे.

Hiraman Khoskar, Nirmala Gavit
Shiv Sena News : माजी मंत्री घोलपांनी वेळ साधली; अखेर ठाकरेंना जय महाराष्ट्र!

काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला असलेल्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी पदाधिकारी असलेले लकी जाधव यांनी काँग्रेसचे तिकीट त्यांनाच मिळेल, असे सांगत खोसकरांना धक्का देण्याचा प्रयत्न केला. यानंतर आदित्य ठाकरेंच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने माजी आमदार निर्मला गावित यांनी सुस्त झालेल्या पक्षाच्या यंत्रणेला हलवले. सभेची तयारी झाली. मात्र, आदित्य ठाकरेंनी वेळेचे कारण देत थेट सिन्नर गाठले.

इगतपुरी मतदारसंघात अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि शिवसेना (Shivsena) अशीच लढत होते. माजी आमदार निर्मला गावित या दोनदा काँग्रेसमधून विजयी झाल्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गावित यांनी अचानक शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे हिरामण खोसकर यांची काँग्रेसमध्ये वर्णी लागली.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघात केलेली कामे आणि निवडणूक यंत्रणा कामाला आणत खोसकरांनी शिवसेनेची डाळ शिजू दिली नाही. शिवसेना फुटल्यानंतर निर्मला गावित यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र आलेत. निर्मला गावित त्यांच्यापरीने जोर लावण्याचा प्रयत्न करत आहेत, तर हिरामण खोसकर काँग्रेस सोडतील, अशी शक्यता नाही. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या वेळी तशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

मात्र, खोसकरांनी विदेशातून परतल्याबरोबर आपण पक्षासोबत असल्याचे जाहीर केले. खोसकरांचे सर्व पक्षांसोबत असलेले हितसंबंध आणि राष्ट्रवादीकडे असलेला ओढा ही त्यांची नकारात्मक बाजू डोकेदुखी ठरू शकते. याबाबत विरोधक आणि काँग्रेसकडूनही प्रश्न उपस्थित केले जातात.

आदिवासीबहुल इगतपुरी मतदारसंघात काँग्रेस हे चलनी नाणे ठरते. भाजपच्या आजवरच्या सर्व लाटेत येथे काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला. त्यामुळे शिवसेना की काँग्रेस या प्रश्नाच्या उत्तरात काँग्रेस पक्षाचे पारडे अनेकपटीने जड आहे.

अशावेळी निर्मला गावितांसमोर राजकीय भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे. 2012 मध्ये त्यांनी शहरात जम बसवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश मिळाले नाही. माजी आमदारांना मतदारसंघ मिळेल की नाही आणि सध्याच्या आमदारांना काँग्रेस तिकीट देईल की नाही, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Hiraman Khoskar, Nirmala Gavit
Aditya Thackeray News : गावितांचे इगतपुरी ‘बायपास’ ठाकरे पोहचले थेट सिन्नरच्या राजाभाऊंकडे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com