Bacchu Kadu : 'एखादी गोळी आपल्याच डोक्यात...'; आमदार गोळीबार प्रकरणावर बच्चू कडूंचा सल्ला

MLA Bacchu Kadu On BJP MLA Ganpat Gaikwad Firing : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गोळी मारली असती तर त्याचं स्वागत केले असतं, बच्चू कडू यांचे विधान
MLA Bacchu Kadu
MLA Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: 'बंदूक देशासाठी काढा, स्वत: साठी नाही. शेतकऱ्यांच्या वा कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर गोळी मारली असती तर त्याचं स्वागत केले असते. देश हितासाठी बंदूक घ्यावी. देशासाठी एखादी गोळी डोक्यात मारून घेतली असती तरी हरकत नव्हती', अशी खोचक टीका प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी केली. (MLA Bacchu Kadu On BJP MLA Ganpat Gaikwad Firing)

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना कल्याणमधील आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून झालेल्या गोळीबाराबाबत पत्रकरांनी प्रश्न उपस्थित केला असता आमदार कडू यांनी ही टीका केली. दरम्यान, याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यांची मागणी होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, हा राजकारणाचा भाग असल्याचे सांगून त्यावर प्रतिक्रिया देण्याचे कडू यांनी टाळले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Bacchu Kadu
Thane Political News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचं 'घर घर मोदी' ; संघर्ष उफाळणार?

देशासाठी बंदूक काढायला हरकत नाही. अगदीच देशहितासाठी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून घ्यायला हरकत नाही. मात्र, स्वहितासाठी बंदूक घेण्यात काही अर्थ नाही, अशी उपहासात्मक टीका कडू यांनी केली. शिवसेनेचे (शिंदे गट) कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. या घटनेचे तीव्र पडसाद सध्या राज्याच्या राजकारणात उमटत असून, यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.

'राजकारण्यांकडे लक्ष देऊ नये...'

सध्या दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल, असे वातावरण आहे. जातीपातीच्या राजकारणाबाबत शिवजयंतीनंतर बोलणार आहे. 20 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सर्व बाजू मांडणार आहे. मंत्री छगन भुजबळ, मराठा आरक्षण यावर काय बोलायचे, हे मी ठरवलेले आहे. मात्र, सगळ्याच्या समाजातील नागरिकांनी सजग राहावे, माझ्यासहीत सर्वच राजकीय व्यक्तींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे. आता निवडणुका असून धर्म आणि जातीच्या लढाया आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत. जातीपातीच्या राजकारणावर आमचा विश्वास नसून शेतकरी आणि श्रमजीवींबाबत लढा सुरूच राहील, असे आमदार कडू म्हणाले.

(Edited By-Ganesh Thombare)

MLA Bacchu Kadu
Nashik News : भाजपमधील ठाकरे फुंकणार लोकसभेचं रणशिंग, पण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com