Milk Price Issue : दूधदराबाबत आमदार काळे अन् लंके अजित पवारांना भेटणार; मंत्री विखेंची होणार अडचण?

MLA Kale and Lanke : दूधदरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास अभिनेते मकरंद अनासपुरेंनीही दिला पाठिंबा, म्हणाले....
MLA Lanke and Kale
MLA Lanke and Kale Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : दूध उत्पादकांकडून दुधाच्या हमीभावाने खरेदीसाठी राज्यभर आंदोलन होत आहे. दुधाचे भाव एवढ्या खाली येण्याचे कारण म्हणजे त्यातील भेसळ रोखण्यात अन्न व औषध प्रशासनाला आलेले अपयश आहे, असे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.

तर दुधाची हमीभावाने खरेदी होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. दुधाच्या भावासाठी हे दोन्ही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लक्ष वेधणार असल्याची भूमिका 'सरकारनामा'शी बोलताना मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Lanke and Kale
Maratha Reservation Issue: मुख्यमंत्र्यांना जमले नाही, ते धाडस विखे पाटील यांनी दाखवले!

राज्यात दुधाला राज्य सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे खरेदीसाठी आंदोलन होत आहे. आंदोलनाला आक्रमक धार आली आहे. शरद पवार यांनीदेखील या आंदोलनाची दखल घेतली आहे. दुधासारखा नाशवंत माल रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालून तातडीने दूधदरवाढीची अंमलबजावणी करावी, असे म्हटले आहे.

यातच नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून दूध उत्पादक बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला अभिनेता मकरंद अनासपुरे यांनीदेखील पाठिंबा दिला. दूध उत्पादक सरकारकडे फक्त सहा रुपये वाढीची मागणी करत आहेत, याकडे अनासपुरे यांनी लक्ष वेधले.

MLA Lanke and Kale
Ahmednagar Politics : ही कोणती पद्धत, वसुबारसला शंभर बोकडांचे बळी ? आमदार लंकेंचा खासदार विखेंवर गंभीर आरोप

भाजपचे कान टवकारले -

भाजप महायुतीच्या राज्य सरकारमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्धविकास हे खाते भाजपकडे असून, ते भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांच्याकडे आहे. सध्या दुधाच्या दरावरून राज्यात दूध उत्पादक आक्रमक आहेत. यातच आता भाजप महायुतीतील राष्ट्रवादीचे आमदार दुधाच्या भाववाढीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची भूमिका घेतल्याने भाजपचे कान टवकारले आहेत. राज्य सरकारच्या अधिवेशनाच्या तोंडावर महायुतीत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या या भूमिकेमुळे भाजपची अडचण वाढते की काय, असे दिसते आहे.

प्रशासन काय कारवाई करते हे मी पाहणार - आशुतोष काळे

आमदार आशुतोष काळे यांनीदेखील दूध आंदोलनाची दखल घेतली आहे. सरकारकडे दूधदरवाढीसाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. दुधाचे दर मध्यंतरी वाढले होते. त्यावेळी दुधाला भाव मिळतो म्हणून भेसळीचे प्रकार वाढले. यातून दुधाच्या उपपदार्थांचे उत्पन्न वाढल्याचे दिसते. ''आरोग्यास हानिकारक असलेल्या भेसळीवर लगाम लावण्यासाठी अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करते हे मी पाहणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी कारवाई करावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधणार आहे,'' असेही त्यांनी सांगितले.

MLA Lanke and Kale
Raju Shetti : राजू शेट्टीचं अमित शाहांना पत्र, केली ही मागणी...

...त्यामुळे दुधाला भाव मिळाला पाहिजे - नीलेश लंके

आमदार नीलेश लंके यांनी दूधदर कोसळण्यावर चिंता व्यक्त केली. शेतीचा जोड व्यवसाय आणि दर दहा दिवसांनी दूध उत्पादकाला हाताला पैसे देणारा हा दूध व्यवसाय आहे. त्यामुळे दुधाला भाव मिळाला पाहिजे. दुधाचे भाव नेमके कशामुळे कमी झाले, हे कळालेले नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथे 30 नोव्हेंबर आणि एक डिसेंबरला मार्गदर्शन मेळावा होत आहे. तिथे अजित पवार यांची भेट घेऊन दूधदरवाढी संदर्भात चर्चा करणार असल्याचेही आमदार लंके यांनी सांगितले.

शेतकरी परग्रहावरील नाहीत - अभिनेता अनासपुरे

दूध उत्पादक शेतकरी रास्त मागणी करत आहे. सरकारने त्याचा विचार करावा. दुधाला सध्या 28 रुपये भाव आहे. तो 34 रुपये करणे म्हणजे केवळ सहा रुपये वाढवणे आहे. ही मागणी साधी आहे. शेतकरी हा परग्रहावरचा नसून, तो आपल्याच महाराष्ट्रातील आणि देशातील आहे. त्यामुळे सरकारने मागण्यांचा विचार करावा, असे मत अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. अकोले येथे दूधदरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास अभिनेता अनासपुरे यांनी भेट देत पाठिंबा दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com