Ahmednagar News : महापालिका कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आणि सीना नदी खोलीकरणासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांचा पाठपुरावा सुरू होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितत या दोन्ही मुद्यांवर बैठक झाली असून, लवकरच हे दोन्ही प्रश्न मार्गी लागतील, असा दावा आमदार जगताप यांनी केला आहे. (Latest Marathi News)
नगर महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी मुंबई मंत्रालयावर लाँग मार्च निघाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत आमदार जगताप यांनी तोडगा काढून लाँग मार्च स्थगित केला होता. नागपूर हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार जगताप यांनी पुन्हा पाठपुरावा केला. त्यानुसार पवार यांच्या अध्यक्षतेखाली या मुद्यांवर बैठक झाली.
नगर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होईल. याशिवाय सफाई कामगारांचा वारस हक्काचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत असून हा प्रश्न संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांचा आहे. यावर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.
तसेच, नगर महापालिका कार्यक्षेत्रातून सुमारे १३ किलोमीटरचे सीना नदीचे पात्र असून, नदीची हद्द निश्चित झाली आहे. आता सीना नदीचे पात्र मातीने भरलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका आहे. याचा फटका शहरवासियांना बसू शकतो. यासाठी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण व्हावे यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा आमदार जगताप करत होते.
त्यांनी प्रत्यक्षात येऊन सीना नदीची पाहणी केली होती. त्यानुसार प्रस्ताव तयार केला असून, त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी उपलब्ध व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. सीना नदीच्या खोलीकरणासाठी लवकरच निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन यावेळी पवार यांनी दिल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.
खोलीकरण झाल्यानंतर पूर रेषेचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, नगर महापालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, महादेव कोतकर, डी. डी. गायकवाड, उपायुक्त श्रीनिवास कुरे, नगर मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष आनंद लोखंडे, सचिव अनंत वायकर, जल अभियंता परिमल निकम बैठकीला उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.