MLA Sangram Jagtap : आमदार जगतापांचे लोकसभेबाबत भाष्य; म्हणाले, 'अजित पवार यांच्या...'

NCP Nagar City Jumbo Executive Committee announced : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची नगर शहर जम्बो कार्यकारिणी जाहीर.
Ajit Pawar,
Ajit Pawar, Sarkarnama
Published on
Updated on

Nagar News : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रदेश पातळीवर काम करून नगरमधून राज्याचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा नगर शहर पक्ष संघटनेतर्फे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्करांनी व्यक्त करताच, 'मी लोकसभेचा उमेदवार नसून विधानसभेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार असून, पुढचा उमेदवार मीच आहे', असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची नगर शहर कार्यकारिणी आज जाहीर झाली. आमदार संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहौपार गणेश भोसले, माजी शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, कुमारसिंह वाकळे, केतन क्षीरसागर, अभिजित खोसे, संजय सपकाळ, वैभव ढाकणे, उबेद शेख उपस्थित होते.

बारस्कर म्हणाले, "आमदार संग्राम जगताप हे राज्यातील एकमेव असे लोकप्रतिनिधी आहेत की, ते लोकांची 'वन टू वन' कामे करतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता सर्वाधिक आहे. त्यांनी आता नगर शहरातून राज्याचे नेतृत्व केले पाहिजे. यासाठी संघटनेने पुढच्या निवडणुकीत जगतापांना आमदार करण्याबरोबरच मंत्री करायचा निर्धार केला आहे". आमदार जगताप यांनी आता प्रदेश पातळीवर कामाला सुरुवात करावी. राज्याचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा बारस्कर यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar,
Sushma Andhare News : ठाकरे गटाच्या अंधारे - अष्टेकर यांच्यात जुंपली; न्यायालयातच उगारली चप्पल...

आमदार जगताप यांनी बारस्कर यांच्या या भाषणावर जोरदार फटकेबाजी केली. "मी लोकसभेचा उमेदवार नाही. पण पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत काम करत राहणार आहे. विधानसभाच लढणार असल्याचे त्यांना सांगितले". संघटनेत काम करताना आमदार जगताप यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. पद घेऊन घरात बसू नका. घराबाहेर पडा. संघटनेत काम करताना टीका होणारच.

घराबाहेर पडल्यानंतर कुत्रे भुंकणारच. त्याकडे दुर्लक्ष करा. मी त्यांच्यासाठी समर्थ आहे. गेल्या 10 ते 12 वर्षात मी सर्व काही अनुभवले आहे. अमेरिका ते औरंगाबाद असा सगळा अनुभव आहे. त्यामुळे चिंता करू नका. कार्यकर्त्यांनी फक्त संघटनेच्या माध्यमातून काम करत राहावे. राज्यात एक नंबरची संघटना नगरची असली पाहिजे, असे आमदार जगताप यांनी सांगितले.

जगताप - विखेंमध्ये झाली होती टक्कर...

2019च्या लोकसभेत राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे सुजय विखे यांच्यात लढत झाली होती. यात भाजपचे सुजय विखे हे विजयी झाले. ही निवडणूक दोघांसाठी चांगलीच 'काॅंटे की टक्कर' ठरली. शरद पवार हे स्वतः प्रचारात उतरले होते. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने आज नगर शहराची जम्बो कार्यकारिणी जाहीर करताना, मी लोकसभेचा उमेदवार नाही, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगून टाकले.

आमदार जगताप यांचे हे विधान म्हणजे, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरचा दावा सोडल्याची चर्चा रंगली आहे. आता राष्ट्रवादी पक्ष फुटला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने मात्र या मतदारसंघात लढाईची जोरदार तयारी केली आहे.

(Edited by Amol Sutar)

R

Ajit Pawar,
Eknath Shinde : "मातोश्री पवित्र मंदिर होते, आता उदास हवेली झाली, तिथून फक्त...", मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com