MNS News : धक्कादायक! मनसेचे दोन उमेदवार गायब, अपहरण झाल्याचा दावा; 24 तासांपासून नाॅट रिचेबल

MNS Ahilyanagar Mahapakila Election : एका ठिकाणी भाजप तर दुसऱ्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढत असलेल्या मनसेच्या उमेदवारांचे अपहरण झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
Political tension escalates in Ahilyanagar as MNS claims abduction of two candidates during municipal election season.
Political tension escalates in Ahilyanagar as MNS claims abduction of two candidates during municipal election season.sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : उमेदवारी मागे घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना अहिल्यानगरमध्ये धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनसेचे दोन उमेदवार मागील 24 तासांपासून संपर्काच्या बाहेर आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांचे अपहरण झाले असावे, असा संशय मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केला आहे. या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये देखील धाव घेतली आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रबळ उमेदवारांनी मनसेच्या उमेदवारांचे अपहरण केल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 17 उमेदवार राहुल जाधव आणि अंबरनाथ बालसिंग असे गायब झालेल्या मनसेच्या उमेदवारांची नावे आहे.

एका ठिकाणी भाजप तर दुसऱ्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात हे उमेदवार उभे राहिले होते. केडगाव या संवेदनशील भागातील हे दोन उमेदवार असल्याने मनसेचे कार्यकर्ते देखील चिंतेत आहेत.

Political tension escalates in Ahilyanagar as MNS claims abduction of two candidates during municipal election season.
Nashik BJP : नाशिक भाजपमध्ये झालेला एबी फॉर्मचा गोंधळ सुनियोजित होता का? शहराध्यक्षांच्या अहवालाने निर्माण झाला प्रश्न

राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडणुकीच्या आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाक क्रमांक आठमधून कुमार वाकळे तर प्रभाग 14 मधून प्रकाश भागानगरे हे विजयी झाले आहेत,

Political tension escalates in Ahilyanagar as MNS claims abduction of two candidates during municipal election season.
Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या 'मतचोरी'च्या मोहिमेला मोठा धक्का? एका सर्व्हेने अडकले चक्रव्युहात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com