Nilesh Lanke Vs Shivsana : खासदार लंके, आमदार कानडेंना शिवसेनेच्या 'मशाली'ची धग? विधानसभेचं गणित बिघडवणार

Shiv Sena Thackeray claim for Parner and Shrirampur seats : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पारनेर आणि श्रीरामपूर मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेच्या या दाव्यामुळे खासदार नीलेश लंके आणि आमदार लहू कानडे यांची विधानसभेतील मत पेरणीची गणिते बिघडू लागली आहेत.
Nilesh Lanke Vs Shivsana
Nilesh Lanke Vs ShivsanaSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पारनेर आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले निरीक्षक खासदार अरविंद सावंत यांची भेट घेत या दोन्ही मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दावा केला.

त्यामुळे या मतदारसंघावर प्रभाव असलेले खासदार नीलेश लंके आणि आमदार लहू कानडे यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पेरणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या 'मशाली'ची धग पोचण्यास सुरवात झाली आहे. शिवसेनेच्या 'मशाली'ची धग लंके आणि कानडे यांचे विधानसभेचे गणित बिघडवणार, अशा राजकीय चर्चेने जोर धरलाय.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके पूर्वी पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. आमदारकीचा राजीनामा देत ते शरद पवारांकडे गेले. खासदार झाल्यानंतर पारनेर मतदारसंघातील आमदारकीची जागा रिक्त आहे. या जागेसाठी सक्षम उमेदवार कोण? अशी चर्चा सुरू असतानाच खासदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचे नाव पुढे येऊ लागले. या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, अशी राजकीय लढत झाली आहे. परंतु आताच्या राजकीय गणितांनुसार परिस्थिती बदलली आहे.

Nilesh Lanke Vs Shivsana
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का; जिल्हाध्यक्षासह युवा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नीलेश लंके यांना खासदार करण्यामागे पारनेरमधील शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे पक्षाने जीवाचे रान केले. शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख श्रीकांत पठारे यांनी महाविकास आघाडीकडून एकहाती पारनेर तालुका संभाळला. शिवसेनेने राज्यात भगवा सप्ताह आयोजित केला आहे. श्रीकांत पठारे यांनी त्यानुसार पुन्हा एकदा तालुका पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. आता शिवसैनिकांनी या विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. तसेच श्रीकांत पठारे यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेत. पारनेर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची तयारी आपण तालुका संपर्कप्रमुख म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पोचवणार असल्याचे तालुका संपर्कप्रमुख दादा येणारे यांनी दिले.

Nilesh Lanke Vs Shivsana
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : खेटाखेटी केली, आता न्यायालयात गेलात, पुन्हा दोन-तीन लाखांनी पाडत असतो; खासदार लंकेंचा विखेंना टोला

पारनेर पाठोपाठ श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केला आहे. निरीक्षक खासदार अरविंद सावंत यांची भेट घेऊन पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर मतदारसंघ शिवसेनेने लढवावा, अशी गळ घातली आहे. लोकसभा निवडणुकीत श्रीरामपूरमधून उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यामागे सर्वाधिक ताकद शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उभी केली होती. शिवसेना ठाकरे पक्षा या ठिकाणी जो उमेदवार देईल, त्याला पूर्ण ताकदीने निवडून आणू, असा विश्वास तालुकाप्रमुख लखन भगत यांनी शिवसेनेचे निरीक्षक खासदार अरविंद सावंत यांच्यासमोर व्यक्त केला. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांचे टेन्शन वाढले आहे.

आमदार लहू कानडे यांना पक्षातंर्गत युवा नेत्यांकडून आव्हान मिळत आहे. त्यातच पुन्हा शिवसेनेकडून आव्हान मिळू लागल्याने त्यांनी तालुक्यात सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेवर प्रभाव पडताना दिसतो आहे. शिवसेना ठाकरे पक्ष एक-एक मतदारसंघावर करत असलेल्या दाव्यामुळे नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com