MPSC Paper Leak : मुलीसाठी पेपर फोडल्याचा आरोप; ‘आदर्श’ शिक्षक अडकला, निलंबनाची टांगती तलवार, पुरस्कारही परत घेणार?

MPSC paper leak award to be withdrawn: अमृत पाटील यांनी आपल्या मुलीसाठी पेपर फोडल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे.
MPSC paper leak accused teacher suspension
MPSC paper leak teacher accusedAI Photo
Published on
Updated on

MPSC Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मार्च महिन्यात घेतलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट आहे. याप्रकरणात अटकेत असलेले नंदुरबार जिल्ह्यातील परिवर्धा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अमृत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.

अमृत पाटील यांनी आपल्या मुलीसाठी पेपर फोडल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. अमृत पाटील यांना राज्य पातळीवर आदर्श पुरस्काराने गौरविले आहे. चांगले काम केल्याने कौतुकाची थाप, म्हणून हा पुरस्कार त्यांना शासनाने दिला होता.

मात्र, याच उत्कृष्ट शिक्षकाने आपल्या मुलीसाठी एमपीएससीचा पेपर फोडल्याचा आरोप होत आहे. चौकशीत अमृत पाटील दोषी आढळ्यास शासन अमृत पाटील यांच्याकडून आदर्श पुरस्कार परत घेणार का, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

MPSC पेपर फुटी प्रकरणात नंदुरबार जिल्ह्यातील चार जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. यात नंदुरबार शहरातील कौटिल्य स्पर्धा परीक्षा क्लाससचे संचालक प्रवीण पाटील, परिवर्धा (ता. शहादा) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अमृत पाटील आणि शनिमांडळ येथील लोकेश ऊर्फ गौरव पाटील व नंदुरबारचे रहिवासी व ‘एममीपीएस’चे सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांचा समावेश आहे.

MPSC paper leak accused teacher suspension
MPSC Paper Leak : प्रेयसीला धडा शिकवायला गेला अन् स्वत:च जाळ्यात अडकला; प्रियकरामुळे असा झाला MPSC पेपरफुटीचा भांडाफोड

मुख्याध्यापक अमृत पाटील यांची काही महिन्यांपूर्वी परिवर्धा शाळेत बदली झाली आहे. दोन्ही पती-पत्नी एकाच शाळेत कार्यरत आहे. मुळचे धुळे जिल्ह्यातील हातनूर येथील रहिवासी असलेले अमृत पाटील जिल्ह्यातील मोलगी, रांझणी, रनाळे येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते. यात एका गावात कार्यरत असताना अमृत पाटील यांच्या बदलीसाठी ग्रमस्थांनी आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांची प्रशासकीय कारणाने बदली झाली होती.

पेपरफुटी प्रकरणात अटक केलेले मुख्याध्यापक अमृत पाटील यांच्यासंदर्भात राज्य शिक्षण विभागाने सविस्तर अहवाल मागविला आहे. त्यानुसार गुरुवारी (दि. २७) गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित केंद्रप्रमुखांना दिले आहेत.

MPSC paper leak accused teacher suspension
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; अव्वर सचिवासह दोन सहायक कक्ष अधिकाऱ्यांना अटक

जिल्हा शिक्षण विभागाने अमृत पाटील यांचा अहवाल राज्य शिक्षण विभागाला पाठविला आहे. यात अमृत पाटील शिक्षण विभागात कधीपासून कार्यरत आहेत? त्यांनी आतापर्यंत कोणकोणत्या शाळेत काम केले आहे?

सध्या कोणत्या ठिकाणी सेवा बजावत आहेत यांसह त्यांच्या सेवाकाळातील वर्तणुकीसंदर्भात माहितीचा अहवालात समावेश आहे. पोलिस दलाकडून पत्र मिळाल्यानंतर अमृत पाटील यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.

ऋतुजा पाटीलला नोटीस?

या प्रकरणातील संशयित ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु ब्रेकअप झाल्याने गौरव पाटील यानेच एमपीएससीला पेपरफुटी झाल्याची तक्रार केली होती असे सांगितले जात आहे. त्यानंतर त्याने ही तक्रार मागे घेतली होती. मुंबई गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावून त्यास अटक केली आहे. ऋतुजा पाटील हिला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नोटीस बजावल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com