MPSC Success Story : वडील शिपाई, आई एसटी वाहक, आजोबांचा भंगार व्यवसाय… संघर्षातून विक्रांत बनला फौजदार; गावाने काढली भव्य मिरवणूक

After financial struggles, repeated setbacks and years of hard work, Akole Vikrant Alhat cracks MPSC and becomes PSI, inspiring thousands aspirants across Maharashtra : अकोले या आदिवासी भागातील कळस गावच्या विक्रांतने MPSC मध्ये घवघवीत यश मिळावले; 2021 मध्ये अपयश, पण हार न मानता 2025 मध्ये मिळवले पोलिस उपनिरीक्षक पद
MPSC Success Story
MPSC Success StorySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra PSI Success Story : अत्यंत सामान्य कुटुंब, आर्थिक अडचणी, अपयशाचे धक्के आणि त्यातून जिद्दीच्या जोरावर उभं राहिलेलं यश… अशी प्रेरणादायी कहाणी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळस गावच्या विक्रांत आल्हाट याची.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत विक्रांतने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली असून त्याच्या यशामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

विक्रांतच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा मोठा संघर्ष दडलेला आहे. वडील प्रकाश आल्हाट शाळेत शिपाई म्हणून काम करतात, आई मंदा आल्हाट राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) वाहक आहेत. आजोबांचा भंगार विक्रीचा व्यवसाय, तर मानलेली आजी, पुष्पा ढगे यांनी छोटी-मोठी मजुरी करत कुटुंबाला हातभार लावला. या कष्टाच्या भक्कम पायावरच विक्रांतने आपल्या यशाचा महाल उभा केला.

अकोले (Akole) तालुक्यातील आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळस गावातून आलेल्या विक्रांतने परिस्थिती बदलण्याचा निर्धार करत स्पर्धा परीक्षांच्या (MPSC) माध्यमातून अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं. त्यामुळे त्याचं यश आता संपूर्ण तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

MPSC Success Story
Brick kiln worker son success story : 30 वर्षे वीटभट्टीवर काम… आईवडिलांच्या कष्टांच्या विटांवर उभं राहिलं स्वप्न! ज्ञानेश्वराने स्पर्धा परीक्षेत कोरलं यशाचं सुवर्णपान

विक्रांतचं प्राथमिक शिक्षण वडगाव लांडगा येथे झालं. त्यानंतर कोपरगाव येथील संजीवनी सैनिक स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढे अगस्ती महाविद्यालय आणि मालपाणी महाविद्यालय येथून बीएस्सी पदवी घेतल्यानंतर त्याने पुण्यात MPSC परीक्षेची तयारी सुरू केली.

MPSC Success Story
Tukaram Mundhe MCOCA action : गुटखा सिंडिकेटवर ‘मकोका’चा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक

मात्र हा प्रवास सोपा नव्हता. 2021 मध्ये दिलेल्या पहिल्याच प्रयत्नात त्याला अत्यंत कमी गुणांनी अपयश आलं. अनेकजण इथेच थांबले असते; पण विक्रांतने हार मानली नाही. सातत्य शिस्तबद्ध अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर पुन्हा तयारी सुरू ठेवली आणि अखेर 2025 मध्ये PSI पद मिळवत मोठं यश मिळवलं.9 जून 2025 रोजी नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण केंद्रात त्याने प्रशिक्षणाला सुरुवात केली असून 15 जूनपासून मुंबई येथे सेवेत रुजू होणार आहे.

विक्रांतच्या यशानंतर गावात जल्लोष

विक्रांतच्या या यशानंतर कळस गावात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ग्रामस्थांनी त्याची भव्य मिरवणूक काढत सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती कैलास वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे, सरपंच, उपसरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पहिला प्रयत्न अयशस्वी, पुढे...

आपल्या यशाबद्दल बोलताना विक्रांत म्हणाला, 2021 मध्ये पहिली MPSC परीक्षा दिली होती, पण काही गुणांनी अपयश आलं. त्यानंतर खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यास सुरू ठेवला. सातत्याने मेहनत घेतली आणि अखेर PSI होण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

संघर्षमय प्रवास सोपा झाला

त्याने पुढे सांगितलं की, माझ्या यशात मानलेल्या आजी पुष्पा ढगे, आई-वडील, भाऊ-बहिणींची मोठी साथ मिळाली. तसेच कैलास वाकचौरे यांचे आर्थिक सहकार्य आणि मित्र नितीन रायकर व धीरज गाढवे यांच्या पाठिंब्यामुळे हा संघर्षमय प्रवास शक्य झाला. मी त्यांचा कायम ऋणी राहीन.

विक्रांतची कहाणी प्रेरणादायी

गरिबी, संघर्ष आणि अपयशावर मात करून अधिकारी बनलेल्या विक्रांत आल्हाटची ही कहाणी आज हजारो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांसाठी नवी ऊर्जा देणारी ठरत आहे. जिद्द असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी यश मिळवता येतं, हे विक्रांतने पुन्हा सिद्ध करून दाखवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com