
BJP Political News : राजस्थान विधानसभेत भाजपने विजय मिळवून सात दिवस उलटून गेले आहेत. मात्र, या सात दिवसांत भाजपला आपला मुख्यमंत्री घोषित करता आला नाही. मुख्यमंत्री पदासाठी नेत्यांमध्ये असलेले स्पर्धा पाहता अजून दोन दिवस तरी नाव निश्चित होणार नसल्याचे समजते. मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपकडून निरीक्षक म्हणून विनोद तावडे, केंद्रीय मंत्री राजस्थान सिंह, सरोज पांडे यांची निवड केली होती. आमदारांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित केले जाईल आणि या नावाची घोषणा दोन दिवसांत म्हणजे सोमवार (ता.11) पर्यंत होण्याची शक्यता आहे.
राजस्थानची निवडणूक ही स्थानिक नेत्याच्या चेहऱ्यावर न लढता ती पंतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या चेहऱ्यावर लढवली गेली. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये आघाडीवर असलेल्या वसुंधरा राजे यांच्या नावाला हिरवा झेंडा पक्षश्रेष्ठींनी अजूनतरी दिला नाही. वसुंधरा राजे यांच्यासोबत महंत बालकनाथ योगी, जयपूर राजघराण्यातील दिया कुमारी, सीपी जोशी, गजेंद्र सिंह शेखावत, भूपेंद्र चौधरी, अर्जुनराम मेघवाल यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत.
ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे नाव कुठेही चर्चेत नसताना त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली. त्याप्रमाणेच अचानक चर्चेत नसलेल्या एखाद्या नेत्यावर गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विश्वास व्यक्त केला जाऊ शकतो. तसेच निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक जयपूरमध्ये होणार आहे. या बैठकीमध्ये विधीमंडळ नेत्याचे नाव निश्चित करण्यात येईल. आमदारांमध्ये या नेत्याबाबत एक मत आहे की नाही, हे निरीक्षक पाहणार आहेत. वेळप्रसंगी मतदानदेखील घेतील.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या महंत बालकनाथ यांनी आपले नाव मागे घेतले आहे. बालकनाथ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत निवडून आल्यानंतर राष्ट्रसेवेची संधी मिळाली. सध्या सोशल मीडियावर माझ्या नावाची जी चर्चा सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष करावे. मला अजूनही प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत.
सात दिवसांनंतरही मुख्यमंत्री निश्चित होत नसल्याने माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी भाजपवर टीका केली आहे. गहलोत म्हणाले, सुशासनाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपला जर मुख्यमंत्री कोण हे निश्चित करता येत नसेल तर ते राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी राखणार. दरम्यान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या आमदारांच्या बैठकीची तारीख निश्चित झाली आहे. रविवारी (ता.10) छत्तीसगडमध्ये तर सोमवारी (दि.11) मध्य प्रदेशमध्ये निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये विधिमंडळ गटाची बैठक होईल.
(Edited by : Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.