Sharad Pawar News : शरद पवार यांचा मुक्काम विखेंची झोप उडवणार ..!

Ahmednagar Lok Sabha Constituency 2024 : कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, मिरवणूक, सभेनंतर असणार मुक्कामी..
nilesh lanke sharad pawar sujay vikhe patil
nilesh lanke sharad pawar sujay vikhe patilsarkarnama

Nagar South Lok Sabha 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अखेर शरद पवारविरुद्ध राधाकृष्ण विखे, असा पारंपरिक सामना सुरू झाला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी यावेळी नीलेश लंके यांच्या रुपाने विखेंविरोधात तगडे आव्हान उभे केले आहे. नगर दक्षिणमध्ये कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निवडून आणायचाच, अशी तयारी शरद पवारांनी केल्याचे दिसते.

शरद पवार आज दिवसभर नगर शहरात तळ ठोकू असणार आहेत. शरद पवार दिवसभराच्या गाठीभेटीनंतर सायंकाळी सभा घेऊन मुक्कामी असणार आहेत. या काळात बरीच राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत आहेत. शरद पवार यांच्या मुक्काम त्यांचे पारंपारिक विरोधक विखेंची झोप उडवणार, असे दिसते आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) चौथ्या टप्प्यात नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी 22 जणांनी 42 अर्ज नेले आहेत.

निवडणुकीचा बिगूल वाजल्याने राजकीय हालचालींना वेग चढला आहे. महायुतीचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्यात नगर दक्षिणमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे.

खासदार विखेंचे भाजपच्या पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली. महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

nilesh lanke sharad pawar sujay vikhe patil
Pratibha Dhanorkar News: नशिबात असतं ते होतंच! बाळू धानोरकरांच्या आठवणींनी प्रतिभाताई भावुक

विखे-लंके यांच्यात सरळ लढत असली, तरी यामागे दोन शक्तींमध्ये लढत दिसेल. शरद पवार आणि राधाकृष्ण विखे यांच्यात ही लढत असणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पवार विरुद्ध विखे, असा सामना जरी असला, तरी पवार यांच्या पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि विखे यांच्याबरोबर भाजपसह त्यांच्याबरोबर असलेले महायुतीचे घटक पक्षांत राजकीय रणकंदन पाहायला मिळेल.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांचा नगर शहरात पहिलाच दौरा आहे.पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीचे शिर्डीत अधिवेशन झाले होते. त्यावेळी शरद पवार तिथे आले होते. यानंतर निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार नगर शहरात दाखल होत आहेत.

पोलीस मुख्यालयात शरद पवार हेलिकॉप्टरने येतील. यानंतर ते टिळक रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये थांबून विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी गाठीभेटी घेतील. जुने आणि जाणते कार्यकर्ते लंके यांच्या प्रचारासाठी सक्रिय करतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

nilesh lanke sharad pawar sujay vikhe patil
Ravindra Dhangekar: पुण्यासाठी आघाडीची फिल्डिंग, धंगेकरांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची हजेरी

पवार आणि विखे यांच्यात पारंपरिक राजकीय शत्रुत्व असल्याने पवार या निवडणुकीत विखे यांच्या विरोधात अधिक सक्रिय होताना दिसत आहेत. यासाठी नगर दक्षिण आणि शिर्डी (Shirdi) लोकसभा मतदारसंघातील जुन्या आणि जाणत्या राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांना बैठकीचे निरोप देण्यात आले आहेत.शरद पवार यांची शहरातील आजचा दीर्घ मुक्काम खासदार विखेंच्या निवडणुकीचा मार्ग अवघड करणार असल्याचे दिसते.

nilesh lanke sharad pawar sujay vikhe patil
Sanjay Raut: राऊतांना नवनीत राणांवरील टीका भोवणार? युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल

सायंकाळी सात वाजता नगर शहरातील गांधी मैदानात शरद पवार यांची सभा होईल. या सभेनंतर देखील शरद पवार नगर शहरात रात्री मुक्कामी थांबणार आहे. या मुक्कामा दरम्यान शरद पवार पुन्हा रात्री पहिल्या फळीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहे.

शरद पवार यांचा हा मुक्काम विरोधकांची झोप उडवणारा ठरणार असे दिसते आहे. या सभेसाठी काँग्रेसचे विधीमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित राहणार आहे. यामुळे सभेकडे विरोधकांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Chaitanya Machale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com