Nandurbar Student Death : विद्यार्थ्याचा शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू; एकनाथ खडसेंचा अधिवेशनात सवाल अन् मुख्याध्यापक, अधीक्षकाला अटक

Nandurbar Ashram School, Student death : शासकीय आश्रम शाळेतील उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात मुख्याध्यापकासह अधीक्षकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती आदिवासी विकास विभागाने दिली.
Nandurbar Ashram School Student death
Nandurbar Ashram School Student deathSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील शासकीय आश्रमशाळेत तिसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा मृतदेह शाळा परिसरातील टाकीत आढळून आला होता. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

यावर आमदार एकनाथ खडसे यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला. त्यावर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षकाला अटक करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाने सभागृहात दिली.

शासकीय आश्रम शाळेतील उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. मृत मुलाच्या वडिलांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा व प्रशासकीय निष्काळजीपणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून दोषींवर काय कारवाई केली व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? अशी विचारणा आमदार खडसे यांनी केली होती.

एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदिवासी विकास विभागाने सांगितले की, ३ एप्रिल २०२६ ला बेपत्ता झालेल्या ब्रायन राहुल गावीत (वय वर्ष ८) या विद्यार्थ्याचा शोध घेतला असता ४ एप्रिल २०२६ ला शाळेच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संबंधित मुख्याध्यापक व वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून, दोघांनाही निलंबित करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाने दिली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आश्रमशाळांमध्ये नर्सची नियुक्ती, सुरक्षारक्षक तैनात करणे व सीसीटीव्ही बसवणे यांसारख्या उपाययोजना केल्या असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.

लहान मुले खेळत असलेल्या परिसरात इतका मोठा धोका असताना त्याकडे कोणाचेही लक्ष कसे गेले नाही? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थितीत केला होता. मृत मुलाच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजीपणाबद्दल आदिवासी विकास विभाग काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर विभागाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com