Congress Leadership : तब्बल 6 वर्षांनी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला मिळणार 'किल्लेदार', इच्छुकांकडून मागवले अर्ज.. हालचालींना वेग

Congress to appoint new leader after 6 years: मागील ६ वर्षांपासून नंदुरबार कॉंग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळालेला नाही. मात्र आता लवकरच नवा जिल्हाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरु झाल्या आहेत.
Sonia Gandhi, Rahul Gandhi
Sonia Gandhi, Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Congress organisational changes latest news: नंदुरबार जिल्हा आणि काँग्रेसचे नाते अनेक दशकांचे, विशेषतः आदिवासी पट्ट्यातील बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे राहिले आहे. राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधींनी १९९८ मध्ये सक्रिय राजकारणात आल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात आपल्या प्रचाराची सुरुवात नंदुरबारमधून केली होती. तसेच कॉंग्रेसने अनेक नव्या धोरणांची सुरुवात देखील नंदुरबारमधूनच केली.

अगदी १९५२ पासून ते २०१४ पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचाच वरचष्मा राहिला आहे. मात्र त्यानंतर नंदुरबारमध्ये कॉंग्रेसची हळूहळू पडझड होत गेली. आपल्या या बालेकिल्ल्यावरील कॉंग्रेसची पकड सैल होत गेली.

गेली सहा वर्ष झाली कॉंग्रेसला नंदुरबार जिल्ह्यात साधा जिल्हाध्यक्ष देखील मिळालेला नाही. त्याचे मुख्य कारण पक्षातील गटबाजी सांगितले जाते. सध्या शिवसेनेत व आमदार असलेले चंद्रकांत रघुवंशी यांनी २०१९ मध्ये कॉंग्रेस सोडली. ते त्यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते.

मात्र त्यांनी कॉंग्रेस सोडली तेव्हापासून आतापर्यंत सहा वर्ष झाली नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाने अद्याप जिल्हाध्यक्षांची निवड केलेली नाही. कार्याध्यक्ष आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष यावरच पक्षाचे काम सुरु होते.

परंतु आता तब्बल सहा वर्षांनंतर नंदुरबार काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीसाठी मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक अखिलेश शुक्ला यांच्या उपस्थितीत ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत नवापूरमध्ये नुकतीच जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली.

या बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, तसेच जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात चर्चा करण्यात आली.

Sonia Gandhi, Rahul Gandhi
Congress News : हीच का काँग्रेसची सृजनशीलता? जाब विचारणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यावर जिल्हाध्यक्षांनी बूट उचलला!

या बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्हाध्यक्ष नसल्याने बराच काळ प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार शिरीषकुमार नाईक यांच्यावर जबाबदारी होती. मात्र पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष नसल्याने संघटनात्मक पातळीवर विशेष कामगिरी दिसून येत नव्हती. जिल्हाध्यक्ष नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली होती.

इच्छुकांकडून अर्ज मागविले

मात्र आता तब्बल सहा वर्षांनंतर नंदुरबार जिल्हा काँग्रेसला पूर्णकालीन जिल्हाध्यक्ष मिळणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले असून, लवकरच मुलाखती प्रक्रिया सुरू होणार आहे.

Sonia Gandhi, Rahul Gandhi
Maharashtra budget session: सुनेत्रा पवार पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत बोलल्या; म्हणाल्या, 'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढवणे हा अजितदादांचा ध्यास होता'

सक्षम नेतृत्वालाच संधी

काँग्रेस पक्षाच्या संघटनवाढीसाठी कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर राखत सर्वसमावेशक व सक्षम नेतृत्वालाच संधी दिली जाईल असं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक अखिलेश शुक्ला यांनी सांगितलं. यावेळी प्रभारी अनिल पाटील, जावेद फारुकी, आमदार शिरीषकुमार नाईक, खासदार ॲड. गोवाल पाडवी, नंदुरबार काँग्रेस कार्याध्यक्ष दिलीप नाईक, राजेंद्रकुमार गावित यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ‘संघटन सुदृढीकरण अभियान’ राबविले जाणार असून, जिल्हाध्यक्ष नियुक्तीनंतर तालुका व विभागीय स्तरावरही नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com