Nashik Crime : काय चाललंय काय? वैष्णवीनंतर आणखी एका सुनेची सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

Bhakti gujarati Death Case : पुण्यात वैष्णवीच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेला सासरा राजेंद्र हगवणेला अटक झाली आहे. या प्रकरणाी सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच नाशिकमधील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Bhakti gujarati Death
Bhakti gujarati DeathSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 24 May : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात आजही हुंड्यासाठी सुनांचा छळ सुरू असल्याचं उघडकीस आलं आहे. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही अतिशय खेदाची बाब आहे.

पुण्यात वैष्णवीच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेला सासरा राजेंद्र हगवणेला अटक झाली आहे. या प्रकरणाी सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच नाशिकमधील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिकमधील गंगापूर येथील विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड येथील अथर्व गुजराती यांची पत्नी भक्ती गुजराती वय 37 यांनी घरातील जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. भक्ती यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून याबाबतचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Bhakti gujarati Death
Satyajeet Tambe BJP : भाजपमध्ये कधी जाणार? सत्यजीत तांबे यांचं मोठं विधान

भक्ती यांचे वडीलांनी मुलीच्या मृत्यूनंतर नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशनला दाखल केली. भक्ती यांना पाच वर्षाचा मुलगा आहे. तर आत्महत्येच्या घटनेनंतर भक्तीचा पती अथर्व गुजराती फरार झाला असून त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी भक्तीच्या कुटंबीयांनी केली आहे.

Bhakti gujarati Death
Karuna Sharma : "राजीनामा द्या, तुम्ही न्याय देऊ शकत नाही..." वैष्णवी हगवणे प्रकरणावरून करूणा शर्मांचा रूपाली चाकणकरांवर हल्लाबोल

त्यामुळे आधीच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच आणखी एका महिलेने सासराच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवल्यामुळे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com