Delimitatio Bill : मतदारसंघ फेररचनेवर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'! गिरीश महाजनांचा 100 टक्के यशाचा दावा; ठाकरेंना थेट आव्हान

BJP Minister Girish Mahajan mocks Shiv Sena over Delimitation Bill : मतदारसंघ फेररचना विधेयकावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण; संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गिरीश महाजनांचे ठाकरे गटाला निवडणूक जिंकण्याचे आव्हान.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Girish Mahajan News : भाजप मतदारसंघाच्या फेररचनेच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात वेगळा प्रभाव निर्माण करण्याच्या दिशेने जात आहे. या प्रश्नावर देशभरातील राजकारण समर्थन आणि विरोध या दोन घटकांत विभागले गेले आहे. संदर्भात भाजप शंभर टक्के यशस्वी होईल असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

मतदारसंघ विभाजनाचे विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या विधेयकाला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप (BJP) यासंदर्भात शंभर टक्के यशस्वी होईल असा दावा केला आहे. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय विचारपूर्वक महिलांना न्याय देण्यासाठी हे पाऊल टाकले आहे. या माध्यमातून महिलांना आरक्षण प्राप्त होईल. महिलांना आरक्षण देण्यास विरोध असलेल्यांचाच या विधेयकाला विरोध असल्याचा दावा मंत्री महाजन यांनी केला.

विधेयकाच्या निमित्ताने काँग्रेस (Congress) पक्ष देशाच्या राजकारणात एकाकी पडला आहे. महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची देखील या माध्यमातून फरफट होत आहे. काँग्रेसचा केवळ विरोधासाठी विरोध असल्याने तो टिकणार नाही.

Girish Mahajan
Rahul Jagtap Vs Vikram Pachpute : बँकेच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांच्या 15 भेटी; शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी मात्र मौन? जगताप-पाचपुते यांच्यात जुंपली!

शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत केलेली आगपाखड योग्य नाही. आमदार आणि खासदार त्यांच्यासोबत राहिलेले नाहीत. हे वास्तव शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सहन होत नाही. रागातूनच ते टीका करीत आहेत. निवडणुका जिंकण्याची त्यांची क्षमता नाही, असा दावा गिरीश महाजन यांनी केला

Girish Mahajan
Sugar industry crisis : देशात साखरेचा 45 लाख टनांचा ठणठणाट! इथेनॉल बंदीचा फायदा नाहीच; महाराष्ट्रातील कारखान्यांवरही संकट

शिवसेना नेते संजय राऊत कोणावरही उठ सुट टीका करीत असतात. त्या ऐवजी त्यांनी आत्मपरीक्षण करून विधाने केली तर ते अधिक बरे होईल. विरोधकांवर आणि सोडून गेलेल्यांवर राग व्यक्त करण्याऐवजी पुढील निवडणुकीत ज्यातील एखादी तरी जिल्हा परिषद त्यांनी जिंकून दाखवावी, असे आव्हान मंत्री महाजन यांनी शिवसेनेला दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.