Dhule Mayor Politics: भाजप महापौरांचा नवा पायंडा, लाल दिव्याची गाडी नाकारली, मानधन अन् वाहन भत्त्याबाबतही घेतला मोठा निर्णय!

Dhule BJP Mayor Mayadevi rejects foreign red light vehicles, municipal corporation will come on scooty-धुळ्याच्या नवनिर्वाचीत महापौरांनी घातला नवा पायंडा, चक्क स्टेटस् सिम्बॉल असलेले लाल दिव्याचे वाहनच नाकारल्याने नागरिकांत चर्चा
Dhule Mayor Mayadevi Pardeshi
Dhule Mayor Mayadevi PardeshiSarkarnama
Published on
Updated on

Mayadevi Pardeshi News: साधा सरपंच म्हटला तरीही फॉर्च्यूनर आणि महागड्या गाड्या हा पायंडाच आहे. राजकारणात स्टेटस म्हणून ते नेहमीचे झाले आहे. कार्यकर्त्यांनाही ते अंगवळणी पडले आहे. अशात धुळ्यातील एक निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.   

भाजप हा सध्या देशातील सर्वात श्रीमंत पक्ष मानला जातो. निवडणुकांपासून तर विविध उपक्रमातून त्याची ही श्रीमंती पदोपदी झळकते. अगदी मंत्र्यांच्या ताफ्यातून अन् नेत्यांच्या वक्तव्यातूनही ती प्रकट होत असते. 

धुळ्याच्या भाजपच्या नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांनी मात्र वेगळी वाट निवडली आहे. त्यांनी महापौर पदाचा कार्यभार स्वीकारताच एक वेगळा निर्णय घेतला. महापौरांसाठी असलेली लाल दिव्याची गाडी त्यांनी नाकारली आहे. 

Dhule Mayor Mayadevi Pardeshi
Hindu Muslim tension Ahilyanagar : संग्राम जगतापांच्या उपस्थित पुतळा जाळला; काही तासांत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, मुस्लिम युवकांची प्रतिउत्तराची ठिणगी!

महापौर परदेशी यांच्या या निर्णयावर अनेकांना आश्चर्य वाटले. राजकीय नेत्यांची ही घोषणा दिखाऊ असावी असे अनेकांना वाटले होते. मात्र महापौर परदेशी या त्यावर ठाम असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही तशीच चर्चा पसरली होती.  

Dhule Mayor Mayadevi Pardeshi
Tipu Sultan Controversy: खासदार बच्छाव शान-ए-हिंद यांच्या पाठीशी; अमेरिकेच्या ट्रेड डीलवरून भाजपला थेट ललकारलं, `हिम्मत असेल तर...`

मात्र महापौर परदेशी यांनी मंगळवारी चक्क पतीच्या स्कुटी वरून महापालिकेच्या कार्यालयात आल्या. रस्त्यावरून येताना भेटलेल्या नागरिकांना त्यांनी अभिवादनही केले. त्यामुळे लाल दिव्याची गाडी नाकारण्यावर त्या ठाम असल्याचे शिक्कामोर्तब झाले.  

महापौरांना मिळणारा इंधनाचा भत्ता देखील त्या शहरातील दिव्यांगांना देणार आहे. दिव्यांगांना लागणाऱ्या व गरजेच्या वस्तू संबंधितांची चर्चा करून या निधीतून दिल्या जातील. हा आपला संकल्प असून महापालिकेच्या खर्चात काटकसर व्हावी, हा त्याचा हेतू आहे. 

मी नगरसेविका म्हणून परिसरातील आणि शहराच्या नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी काम करणार आहे. यामध्ये लाल दिव्याची गाडी आणि बडेजाव हा नागरिक व आमच्या संपर्कात अडथळा ठरू शकतो. त्यामुळे महापौर म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर मी हा वेगळा निर्णय घेतला आहे, असे महापौर परदेशी यांनी सांगितले. 

साधा नगरसेवक असला तरीही वर्षभरात महागड्या गाडीतून त्यांचा वावर असतो. राजकारणातील स्टेटस सिम्बॉल म्हणून ते अनेकांना आवश्यक वाटते. राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये साधेपणा लुप्त झाला आहे. अशात धुळ्याच्या महापौर परदेशी यांनी घेतलेला निर्णय हा वेगळ्या पठडीतला म्हणून चर्चेचा विषय आहे. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com