Captain Ashok kharat scandal: नशीब सांगता सांगता स्वतःचं नशिब चमकवल!, नेत्यांना गंडवून शेकडो कोटी कमावणारा कॅप्टन आहे तरी कोण?

Nashik captain Ashok kharat exposed in 2005 political leaders and womens in contact -कॅप्टन अशोक खरातचा २१ वर्षांपूर्वीच सकाळने केला होता भंडाफोड, नेत्यांच्या आर्शिवादानेच झाला मोठा
Captain Ashok Kharat
Captain Ashok KharatSarkarnama
Published on
Updated on

Fraud Baba- Political Leader News: कॅप्टन अशोक खरात यांच्या विरोधात महिलांच्या शोषणाचा गुन्हा दाखल झाल्याने तो चर्चेत आला. मात्र त्याचा हा गोरख धंदा चक्क २५ वर्षांपासून सुरू होता.त्याला तो २००५ मध्येच एक्सपोज झाला होता, याची अनेकांना कल्पनाच नाही. 

कॅप्टन अशोक खरात यांनी महिला आणि राजकीय नेत्यांना नादी लावण्याचा अनोखा फंडा सुरू केला होता. त्याच्या संपर्कात अनेक राजकीय नेते आणि सत्ताधारी मंत्री आले आहेत. त्यात सध्याच्या महायुती सरकार मधील मंत्री प्रमुख आहेत. 

अशोक खरात गेले पंधरा वर्षे हा उद्योग करीत होता, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात त्याचा हा गोरख धंदा चक्क 25 वर्षांपासून सुरू होता. त्याच्या कृष्णकृत्यांचा पडदा फास २००५ मध्येच सकाळ वृत्तपत्राने एका वृत्तमालिकेद्वारे केला होता. 

Captain Ashok Kharat
Ashok Kharat Assets : 150 कोटींची जमीन, 10 कोटीचे मंदिर..., विकृत विलास खरातची संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का!

महिला आणि विशेषतः राजकीय नेत्यांना नादी लावण्याचे काम खरात याने सुरू केले. त्याच्या जाळ्यात अनेक राजकीय नेते अडकत गेले. या नेत्यांच्या माध्यमातून त्याने अफाट पैसा गोळा केल्याचे बोलले जाते. त्यामुळेच अलीकडच्या काही काळात शेकडो कोटींच्या मालमत्ता आणि जमिनींमध्ये गुंतवणूक झाल्याचे पुढे आले आहे. 

Captain Ashok Kharat
Sushma Andhare Allegations Rupali Chakankar : राजकारण्यांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषकडे 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सुषमा अंधारे यांचे चाकणकरांकडे बोट; काय आहे प्रकरण?

कॅप्टन खरात याने कॅनडा कॉर्नर येथे "ओकस प्रॉपर्टीज"या नावाने आपले कार्यालय सुरू केले होते. कार्यालयात संशयास्पद घटना आणि कामे होत होती. त्यामुळे २००५ मध्ये त्याचे जालीम ऑपरेशन करून त्याला उघडा पाडण्यात आला. 

सकाळमध्ये याबाबतची मालिका प्रसिद्ध झाली. त्यानंतर अशोक खरात कार्यालय बंद करून अनेक दिवस परागंदा झाला होता. नंतर त्याच्यामध्ये तिला काही राजकीय नेते आले आणि पुन्हा एकदा त्याने आपला गोरखधंदा सुरू केला. 

अलीकडच्या काळात त्याने अनेक नेते आणि लोकप्रतिनिधी पडद्यामागे त्याच्या मदतीला धावून आले. त्यातूनच गेल्या काही वर्षात विशेषता शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सत्तेत आल्यावर त्याची भरभराट झाली. शिंदे गटाच्या एका मंत्राने त्याला प्रचंड मदत केल्याचे बोलले जाते. त्यामुळेच अशोक खरात याची भरभराट झाली आहे. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com