Captain Ashok Kharat: खरातचा मुक्काम कारागृहातच; नाशिकच्या न्यायालयात जामिनावर सुनावणी टळली!

Nashik Captain Ashok Kharat granted bail by SIT in sexual exploitation of women hawala racket -भोंदू कॅप्टन अशोक खरातची ईडी कडूनही सुरू आहे चौकशी, महिला लैंगीक शोषण प्रकरणात अडचणी वाढणार काय?
Ashok-Kharat.
Ashok-Kharat.Ashok-Kharat.
Published on
Updated on

Women Sexual Abuse News: भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण इडी कडून चौकशी स्वरूप आहे. या प्रकरणात ईडीने अद्याप आपला तपास जाहीर केलेला नाही. त्यामुळे कॅप्टन अशोक खरात याच्या अडचणी कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधात महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर तक्रारी आहेत. यासंदर्भात नाशिक शहरासह जिल्ह्यात १४ तक्रारी दाखल आहेत. त्यांचा राज्य शासनाने नियुक्त केलेल्या एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या पथकाकडे तपास पूर्ण झाला आहे. 

महिला लैंगिक शोषणाच्या आठ तक्रारी कॅप्टन अशोक खरात यांच्या विरोधात दाखल आहेत. यांचा तपास पूर्ण झाला आहे. संदर्भात न्यायालयात आरोप पत्र देखील दाखल करण्यात आले आहे. पार्श्वभूमीवर कॅप्टन खरात याच्यावतीने जा मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. 

Ashok-Kharat.
Ashok Kharat Case : राजकीय नेत्यांशी संबंधांचे आरोप; अशोक खरात प्रकरणात अद्याप कारवाई का नाही? यंत्रणांची सहानुभूती मिळाल्याची चर्चा

कॅप्टन खरात याच्या जामीनाबाबत नियमित खटला सुरू असलेले न्यायाधीश रजेवर आहेत. त्यामुळे बुधवारी होणारी सुनावणी तळली आहे. प्रकरणात आता पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला होणार आहे. 

Ashok-Kharat.
Ashok Kharat Bail : अशोक खरातला आज जामीन मिळणार? उज्ज्वल निकमांचा विरोध; SIT तपासामुळे उत्सुकता

राज्य शासनाने कॅप्टन अशोक करा प्रकरणात ॲड उज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. कुठल्याच कामकाजात उज्वल निकम यांसह पीडित महिलाही हजर झालेले आहेत. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीत जामीनावर संबंधितांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. 

जामिनाची सुनावणी तळली त्यामुळे कॅप्टन खरात याचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. त्याचा जामीनाचा मार्ग सुकर नसल्याने सुनावणीकडे दोन्ही पक्षांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात ईडीने अद्याप आपला तपास पूर्ण केलेला नाही. 

बुधवारी झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांसह पीडित महिला देखील सत्र न्यायालयात उपस्थित होत्या. मात्र नियमित सुनावणी पुढे ढकलण्यात आली. यापूर्वी झालेल्या मागील सुनावणीसाठी संबंधितांनी जमिनीला विरोध करून भक्कम पुरावे सादर केले होते. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com