Nashik Land Scam : नाशिकमधील आणखी एक घोटाळा पोहचला विधिमंडळात ; आमदार अनिल परबांचे भाजप नगरसेवकावर आरोप, SIT चौकशीची मागणी..

Nashik CIDCO Land scam : नाशिकमधील म्हाडा फसवणूक प्रकरण गाजत असतानाच आता आणखी एक भूखंड घोटाळा विधिमंडळात पोहचला आहे.शिवसेना (उबाठा) आमदार अनिल परब यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली.
NMC Building, Nashik.
NMC Building, Nashik.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics News : नाशिकमधील म्हाडा घरकुल घोटाळा सध्या गाजत असून याप्रकरणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधीमंडळात लक्षवेधी सूचना मांडली होती. महसूलमंत्र्यांनी त्यावर चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती या घोटाळ्याचा तपास करत आहे. असे असताना नाशिकमधील आणखी एक भूखंड घोटाळा विधिमंडळात पोहचला आहे.

सिडकोच्या नेबरहूड सेक्टरमधील एक भुखंड क्रीडा व सामाजिक सुविधांसाठी आरक्षित असतानाही भाजप नगरसेवक व महापालिकेचे नगररचना विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेंद्र आहेर यांच्यासह राहुल मालपाणी यांनी या भूखंडावर मंगल कार्यालय बांधल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे.

या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करून संबधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील शिवसेना (उबाठा) आमदार अनिल परब यांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणी शासनाकडून महापालिकेला चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

NMC Building, Nashik.
Nashik News : फक्त दोन मार्कांनी पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, तरुणीने घेतला टोकाचा निर्णय..

नेमका विषय काय?

सिडकोतील नेबरहूड सेक्टर, एमएसडी येथील प्लॉट क्रमांक २९ चे एकूण क्षेत्रफळ ६२६९.४८ चौरस मीटर आहे. सदरचा भुखंड क्रीडा व सामाजिक सुविधांसाठी आरक्षित होता. परंतु भाजप नगरसेवक राजेंद्र आहेर व जमीन मालक राहुल नंदकुमार मालपाणी यांनी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन केले. त्या जागेवर शिवतेज गार्डन ॲण्ड बँक्वेट हॉल नावाने अनधिकृत मंगल कार्यालय उभारण्यात आले असून त्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

या मंगल कार्यालयाला भोगवटा प्रमाणपत्र नसतानाही सदर जागा भाड्याने देण्यात आल्याची तक्रार महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्याकडे करण्यात आली. परंतु त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी मो. क. बागवान यांनी महापालिकेला पत्र पाठवून यासंदर्भात राजेंद्र आहेर व जागा मालक राहुल मालपाणी यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व मंगल कार्यालय सील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरोप चुकीचे

दरम्यान भाजप नगरसेवक राजेंद्र आहेर यांनी आपला या भूखंडाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. शिवतेज मंगल कार्यालय प्रकरणात माझ्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

NMC Building, Nashik.
Nashik MHADA Scam : नाशिक म्हाडा फसवणूक प्रकरणाचा होणार पर्दाफाश : आयुक्त गेडाम-कर्णिकांची एण्ट्री, चौकशीसाठी 6 सदस्यीय समिती गठीत

तक्रारीत तथ्य नाही

दरम्यान तक्रारीत कोणतेही तथ्य नाही. सदरचा भूखंड आरक्षित नव्हता, तर अॅमिनिटी स्पेस होती. त्याचे अनेक व्यवहार झाले असून सिडकोची एनओसी आहे. तसेच महापालिकेचा पूर्णत्वाचा दाखला असून, सदरचे बांधकाम नियमानुसार आहे. त्याचे पुरावे देखील सादर केल्याचे जमीन मालक राहुल मालपाणी यांनी म्हटलं आहे. (Nashik News)

दरम्यान याप्रकरणी महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नगर नियोजन विभागामार्फत मालपाणी व आहेर यांना १६ मार्च व ४ एप्रिल २०२६ रोजी दोन नोटिसा पाठविल्या आहेत. त्यानुसार भोगवटा प्रमाणपत्र व महापालिकेच्या परवानगीचे कागदपत्र नगरनियोजन विभागाकडे सादर केल्याचा दावा आहेर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com