Nashik NMC : नाशिकमध्ये स्वीकृतसाठी जोरदार लॉबिंग; सहा, दोन, एक-एक च्या फॉर्म्युल्याची चर्चा, पण..

co opted corporator Nashik NMC : महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजपने बाजी मारली आहे. त्यामुळे संख्याबळ पाहाता भाजपच्या वाट्याला अधिक स्वीकृत नगरसेवक येणार हे स्पष्टच आहे.
Nashik municipal elections Girish Mahajan And Ajit Pawar
Nashik municipal elections Girish Mahajan And Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता नाशिकमध्ये महापौरपद व स्वीकृत नगरसेवक या पदांसाठी जोरदार लॉबिंग सुरु झाली आहे. यंदा महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवक राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यात पक्षीय संख्याबळाच्या गणितानुसार भाजपला सर्वांधिक ६, शिवसेना शिंदे गटाला २ तर शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी १- जागा स्वीकृतसाठी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

मागच्यावेळी महापालिकेत ५ स्वीकृत नगरसेवकांना संधी दिली होती. यावेळी शासनाने धोरण बदलल्यास स्वीकृतांची संख्या दुप्पट म्हणजेच १० वर जाण्याची शक्यता आहे. स्वीकृत नगरसेवक करण्याचे आश्वासन हे राजकीय पुनर्वसनाचे एक प्रभावी साधन मानले जाते. ज्या इच्छुकांना उमेदवारी देता आली नाही अशांना स्वीकृतचे लॉलीपॉप दाखवलेले असते. त्यामुळे स्वीकृतांचा आकडा अधिक असावा, अशी सर्वच पक्षांची अपेक्षा असते.

तिकीट वाटपात ज्यांना-ज्यांना संधी देता आली नाही त्यांना स्वीकृतच्या रुपाने संधी देण्याचा भाजपसह शिंदे सेना व ठाकरे सेनेचा प्रयत्न आहे. मात्र, मोठ्या महापालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या केवळ १० पर्यंत मर्यादित असल्याने या पक्षांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वीकृतसाठी सर्व अर्थाने लॉबिंग सुरू झाली आहे.

Nashik municipal elections Girish Mahajan And Ajit Pawar
NCP Unity Talks : महापालिका निवडणुकीत 'पानिपत', आता जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५ (२) (ब) नुसार १० टक्के किंवा १० सदस्य यापैकी जे कमी असेल, इतकेच स्वीकृत नगरसेवक नेमता येत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संभावित १० नगरसेवकांमध्ये कोणत्या पक्षाचे किती, त्याबाबतची आकडेमोड सध्या सुरु असून त्यादृष्टीने नियोजन केले जात असल्याची चर्चा आहे. निवडून आलेल्या दहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत असे समीकरण राहिल्यास मात्र यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पत्ता कट होऊन भाजप ७, शिवसेना शिंदे गटाला २ व शिवसेना उबाठा ला एक असे स्वीकृत निवडले जातील.

दरम्यान नाशिकमध्ये सर्वांधिक इच्छुक हे भाजपमध्ये होते. त्यामुळे अनेक निष्ठावंतांना उमेदवारी न देता आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला. मात्र ज्यांना आता संधी मिळालेली नाही त्यांना भविष्यात स्वीकृत नगरसेवकांसह अन्य पदांवर संधी दिली जाणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले होते. त्यामुळे आतापासूनच भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी लॉबिंग लावली जात आहे. स्वीकृतसाठी इच्छुक असलेल्यांकडून शहराध्यक्षांसह स्थानिक नेत्यांकडे पाठपुरावा करत फील्डींग लावली जात आहे.

Nashik municipal elections Girish Mahajan And Ajit Pawar
Nashik Election : सुनिल बागूल यांच्या ३० वर्षांच्या सत्तेला ब्रेक, प्रमोद पालवे ठरले गेमचेंजर

निवडणुकीत बंडखोरी केलेल्या जवळपास ५७ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भाजपकडून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उमेदवारी न मिळूनही एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकाऱ्यांचा तसेच निवडणुकीत अगदी कमी फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांचा विचार भाजपकडून केला जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com