Nashik Election : सुनिल बागूल यांच्या ३० वर्षांच्या सत्तेला ब्रेक, प्रमोद पालवे ठरले गेमचेंजर

Sunil Bagul politics break : मुलगा मनीष यांच्या पराभवामुळे सुनिल बागुल यांच्या सत्तेच्या राजकारणाला एकप्रकारे ब्रेक बसला आहे. शिवसेनेच्या प्रमोद पालवे यांनी भाजपच्या मनिष बागुल यांचा पराभव करत ते जायंट किलर ठरले आहेत.
Pramod Palve, Sunil Bagul
Pramod Palve, Sunil BagulSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपमध्ये गेलेले सुनील बागूल यांचा मुलगा मनीष यांचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग ६ मध्येच पराभव झाल्याने हा बागुल कुटुंबीयांसाठी जबर धक्का मानला जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बागुल कुटुंबीय या भागातून निवडून येते. मात्र मनीष यांच्या पराभवामुळे सत्तेच्या राजकारणात बागूल कुटुंबीयांना एकप्रकारे ब्रेक बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे अतिशय साधारण उमेदवार प्रमोद पालवे यांनी बागुल यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. सुनिल बागुल यांचे चिरंजीव मनीष (शंभू) बागूल यांचा पराभव करत प्रमोद पालवे हे गेमचेंजर ठरले आहे.

पंचवटी विभागातील प्रभाग क्रंमाक ६ मध्ये मुख्यत्वे मखमलाबाद व रामवाडी असे दोन भाग आहेत. पाटाच्या अलीकडे व पलीकडे असे दोन घटक प्रभावी ठरतात. पाटाच्या पलीकडे म्हणजे रामवाडी भागाकडून एकही उमेदवार निवडून आला नाही. मखमलाबादकरांनी त्यांच्याच भागातील उमेदवार निवडून देत प्रभाग भक्कम केला.

Pramod Palve, Sunil Bagul
Nashik Politics : अब तेरा क्या होगा कालिया? नाशिकच्या तिन्ही भाजप आमदारांना हे वाक्य आठवलं तर नसेल?

प्रभाग ६ मध्ये चारपैकी तीन जांगावर भाजपचा विजय झाला आहे. त्यामध्ये अ गटात भाजपच्या चित्रा तांदळे विजयी झाल्या. ब गटात भाजपचे वाळू काकड विजय झाले. तर क गटातही भाजपच्या रोहिणी पिंगळे विजयी झाल्या. मात्र ड गटाचा निकाल बागुल यांच्यासाठी धक्कादायक ठरला. 'ड' गटात भाजपचे मनिष बागुल यांचा शिवसेना शिंदे गटाचे प्रमोद पालवे यांनी पराभव केला.

मखमलाबाद भागातील एकगठ्ठा मतदारांनी मनीष बागुल यांना डावलून प्रमोद पालवे यांना साथ दिली. हे त्यांच्या विजयाचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळेच 'ड' गटात मोठा उलटफेर झाला. वरच्या तीन जागा भाजपच्या निवडून आल्या मात्र 'ड' ची जागा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रमोद पालवी यांनी राखली. बागुल यांचे राजकीय वजन त्या जोडीला असलेली भाजपची संघटनात्मक ताकद या सगळ्यांवर प्रमोद पालवे यांनी मात केली.

Pramod Palve, Sunil Bagul
Sudhakar Badgujar : ज्यांच्या भाजप प्रवेशाला सर्वाधिक विरोध झाला 'त्या' सुधाकर बडगुजरांनी रचला इतिहास, नाशिकमध्ये होतेय चर्चा..

सुनील बागूल यांना नाशिकच्या राजकारणातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जाते. शिवसेनेत त्यांनी दीर्घकाळ जिल्हाप्रमुख, उपनेते तसेच सहसंपर्क प्रमुख अशी महत्त्वाची पदे सांभाळत संघटनात्मक कामकाजाची धुरा समर्थपणे पेलली. निवडणुकीच्या अगदी तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या राजकीय ताकदीत अधिक वाढ झाल्याची चर्चा रंगली होती. त्यातूनच त्यांनी पुत्र मनिष यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. पण प्रमोद पालवे यांनी बागूल यांची बालेकिल्ल्यातच धूळधाण करत त्यांना धूळ चारली. त्यामुळे या निकालाची नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com