Nashik Crime : खंडणीसाठी बिल्डरचे अपहरण, पत्नीला धमकी ; उद्धव ठाकरेंचा पदाधिकारी 'कायद्याच्या बालेकिल्ल्यात'

Nashik crime : महिला व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह चार जणांना आडगाव पोलिसांना ताब्यात घेतल. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik crime
Police arrest Thackeray group leader Vishal KadamSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : गुन्हेगारीमध्ये सहभागी असलेले सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नेते नाशिक पोलिसांच्या रडारवर आहेत. सत्ताधारी पक्षासह अनेकांना आतापर्यंत पोलिसांनी आपला खाक्या दाखवला आहे. आडगाव परिसरात महिला व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यासह त्याच्या नातेवाईकास पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला व्यावसायिकाच्या पतीचे अपहरण करुन खंडणी उकाळणारा उबाठाचा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचा संघटक संशयित विशाल कदम याच्यासह त्याचा नातेवाईक अमित पाटील याला अटक करुन पोलिसांनी दिवाळीचा फराळ दिला. त्यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे वाक्य त्यांच्याकडून वदवून घेण्यात आलं. न्यायालयाने त्यांना २८ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी अमृतधाम येथील सनराईज रेसिडेन्सीत राहणाऱ्या सारिका विजय शिरोडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. २०२० पासून १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पती विजय शिरोडे पंचवटीसह अन्य परिसरात बांधकाम व्यवसाय करीत होते. त्यांनी व्यवसायानिमित्त विशाल कदम याच्याकडून काही रक्कम हातउसनवार घेतली होती. विशाल हा ठाकरे गटाचा पदाधिकारी आहे, त्याने त्या उसनवारीवर दिलेल्या पैशांवर व्याज आकारायला सुरुवात केली.

Nashik crime
Nashik Central Jail : नाशिकच्या कारागृहात आणखी एक हादरवणारी घटना ! कैद्याने घेतला टोकाचा निर्णय..

त्यानंतर उसनवार दिलेल्या या रकमेवर कदमने मनमानी 'व्याज' वसूल केले. त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण केले व त्यांच्या पत्नीस धमकी दिली. जबदस्तीने कागदपत्रांवर सह्या घेतल्या. शिरोडे व त्यांच्या पतीच्या नावे असलेल्या मालमत्ता हडप केल्या. या दरम्यान अनेकदा फोनवर जीवे मारण्याच्याही धमक्या दिल्या. (Nashik News)

मालमत्ता खरेदी केल्या नंतर त्यांनी शिरोडे यांच्या बँक खात्यावर दिशाभूल करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने रक्कम पाठविण्यात आल्याचे दाखविले. पाठवलेली रक्कम शिरोडे यांना धमकावत पुन्हा विशालच्या मित्रांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. विशालने शिरोडे यांच्या खात्यातील अन्य रक्कमही आपले मित्र तसेच नातेवाईकांच्या खात्यावर वर्ग केली.

Nashik crime
Girish Mahajan Politics : अन् एका रात्रीत खाट पाडली, रोहिणी खडसेंचा पराभव कसा केला ते गिरीश महाजनांनी सांगितलं..

दरम्यान विशाल कदमचे आणखी काही काळे कारनामे बाहेर येण्याची शक्यता आहे. तर, या गुन्ह्यात सिद्धेश्वर रामदास आंडे, शंकर गोवर्धन वाडेकर हे संशयित फरार असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com