Pune Crime : पुण्यात १ कोटींच्या दरोड्याचा प्लॅन, दोन पोलिसांनी तोतया पत्रकारासह आखला डाव; CCTV मुळे भांडाफोड!

Robbery Police : हर्षवर्धन पवार हे त्यांचे सहकारी किरण आपटे यांच्यासह १ कोटी रुपयांची रोकड घेऊन बँकेच्या दिशेने चालले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांची गाडी अडवत त्यांना लुटल्याचा प्लॅन आखला होता.
Pune Crime News
Pune Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील नवले पुलावर एका व्यावसायिकाची गाडी अडवून तब्बल १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पण या प्रकरणात जे सत्य समोर आले त्यामुळे संपूर्ण पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. कारण, रक्षकच इथे भक्षक बनल्याचे उघड झाले आहे.

या दरोड्याच्या कटात चक्क ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस अंमलदार आणि एका तोतया पत्रकाराचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले.

नऱ्हे पोलिसांनी याप्रकरणी एका तोतया पत्रकाराला बेड्या ठोकल्या असून, राजगड पोलीस ठाण्याच्या खेड शिवापूर पोलीस चौकीतील महिला पोलीस हवालदारासह एक पोलीस शिपाई सध्या फरार आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

ही थरारक घटना घडली १८ जुलै रोजी पुण्यातील गजबजलेल्या नवले पूल परिसरात घडली. फिर्यादी हर्षवर्धन पवार हे त्यांचे सहकारी किरण आपटे यांच्यासह १ कोटी रुपयांची रोकड घेऊन बँकेच्या दिशेने चालले होते. नवले पुलाजवळ अचानक काही जणांनी त्यांची गाडी अडवली. "आम्ही पोलीस आहोत, तुम्ही बेकायदेशीर पैसे घेऊन जात आहात," असा दम भरत दरोडेखोरांनी गाडीचे दरवाजे उघडायला लावले आणि १ कोटी रुपयांची रोकड असलेल्या दोन्ही बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला.

मात्र प्रसंगावधान राखत किरण आपटे यांनी ७३ लाख रुपये असलेली एक बॅग तात्काळ तिथून सुरक्षितस्थळी हलवली आणि तब्बल ७३ लाख रुपये लुटले जाण्यापासून वाचले. पण उर्वरित २६.५० लाख रुपये असलेली दुसरी बॅग पवार यांच्याकडेच राहिली. आरोपींनी पवार यांना त्यांच्याच गाडीत कोंडले आणि थेट शिवापूर येथील चौकात नेहले तिथे या २६.५० लाख रुपयांपैकी २० लाख रुपये उकळण्याचा डाव आखला गेला.

Pune Crime News
Pune Police : बुधवार पेठेतील 'त्या' गल्लीत पोलिसांनीच मांडला वसुलीचा धंदा? 'तोडपाणी' करणाऱ्या पोलिसांवर मोठी कारवाई!

सीसीटीव्हीने फोडलं खाकीचं बिंग!

खेड शिवापूर पोलीस चौकीत महिला पोलीस अंमलदाराच्या मदतीने तोतया पत्रकाराने २० लाखांची रक्कम स्वतःच्या दुचाकीच्या डिक्कीत टाकली खरी, पण प्रकरण अंगलट येईल अशी चाहूल लागताच त्यांनी ती रक्कम पुन्हा बॅगेत आणून ठेवली. आरोपींना वाटलं पोलीस चौकीत 'सीसीटीव्ही' नाहीत म्हणजे आपण वाचलो! पण चौकीच्या समोरील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण संशयास्पद प्रकार कैद झाला अन् पोलिसांचाच भांडाफोड झाला.

विशेष म्हणजे, या प्रकरणात सुरुवातीला दोन्ही पोलीस कर्मचारी आणि तोतया पत्रकाराची नावे गुन्ह्यातून वगळण्याचा प्रयत्न झाला. मात्र, नवले पूल आणि परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तपासाची चक्रे थेट पोलिसांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचली. अखेर पोलिसांना पुरवणी गुन्ह्याद्वारे आपल्याच सहकाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करावी लागली.

अटक केलेले आरोपी

अटक करण्यात आलेले आरोपींमध्ये आशिष तिवारी (तोतया पत्रकार), विक्रम चाकणकर, अमेय कार्ले आणि गणेश कदम यांचा समावेश आहे. तर, फरार आरोपींमध्ये महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित इरफू मेस्री यांच्यासह इतर तीन जणांचा समावेश आहे. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Pune Crime News
Hingoli Crime : जुन्या वादातून अंदाधूंद गोळीबार, एकाचा मृत्यू ; शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकासह सोळा जणांवर गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com