Nashik Crime : अडीच लाखांच्या कर्जावर उकळले साडेआठ लाखांचे व्याज, अवैध सावकाराकडून शिक्षकाला बेदम मारहाण

Teacher beaten by moneylender : अवैध सावकाराकडून शिक्षकाला डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या शाळेत नोकरीच्या ठिकाणी गुंड घेऊन जात त्यांना शिवीगाळ करुन दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत आहे.
Teacher beaten by moneylender
Teacher beaten by moneylenderSarkarnama
Published on
Updated on

Nashik Cime : नाशिकमधील एका शिक्षकाने अवैध सावकाराकडून घेतलेल्या अडीच लाख रुपयांच्या कर्जावर सुमारे साडे आठ लाख रुपयांची खंडणी वसूल करत संबधित शिक्षकाला मारहाण केल्याचा व धमकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध सावकारीच्या माध्यमातून मोठ्या व्याजाने पैसे देऊन त्याची परतफेड करताना धमकावणे, मारहाण करणे व खंडणी उकळल्या प्रकरणी शिक्षक इखलाख अहमद मुश्ताक अहमद यांनी फिर्याद दिली आहे. ते उर्दु हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित चंद्रशेखर प्रभाकर शिंदे ऊर्फ पिंटू शिंदे (रा. नाशिक रोड), अभिजित ऊर्फ बबलू पाटील (रा. जेल रोड), विशाल विजय बहेनवाल (रा. देवळाली गाव, नाशिक रोड), अनिल दुसाने (रा. गायके कॉलनी, तरण तलाव रोड, नाशिक रोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील दत्तमंदिर रोड, धोंगडेनगर येथील रोशन व्हिला येथे राहणारे शिक्षक इकलाख अहमद मुश्ताक अहमद यांनी पत्तीच्या आजारामुळे पैशांची गरज असल्याने अवैध सावकारी करणाऱ्या संशयित चंद्रशेखर शिंदे याच्याकडून २०१७ मध्ये दरमहा ७ टक्के व्याजाने अडीचलाख रुपये घेतले होते. त्या रकमे पोटी २५ महिन्यांत चार लाख ३७,५०० रुपये व्याज दिले.

Teacher beaten by moneylender
Rohini Khadse : अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू ; रोहिणी खडसे यांचा फडणवीस सरकारला इशारा

त्यानंतर २०२० मध्ये पैशांची गरज भासल्याने शिक्षक इकलाख अहमद यांनी पुन्हा दहा टक्के व्याजाने दोन लाख रुपये घेतले. त्याच्या व्याजापोटी एक लाख ४० हजार दिले. त्यानंतर पुन्हा पैशांची गरज भासल्याने इकलाख यांनी सावकार शिंदेंकडून घर व आपली इनोव्हा कार गहाण ठेऊन दोन लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले. या दोन लाख रुपयांचे चार महिन्यात ८० हजार रुपये व्याज झाले.

मागील व चालू रकमेची तीन लाख रुपये मुद्दल शिंदे यांनी 'ग्राह्य धरून ऑक्टोबर २०२० सालापासून दहा टक्के व्याजाने २३ हजार रुपये व्याज आकारले. ऑक्टोबर ते मार्चपर्यंत यापोटी एक लाख ३८ हजार रुपये व्याज दमदाटी, मारहाण करून धाक दाखवून वसूल केले. इखलाक यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने व्याजाचे पैसे देणे त्यांना शक्य झाले नाही. आर्थिक अडचणीमुळे अहमद यांना व्याज देणे शक्य न झाल्याने संशयितांनी अहमद यांच्या घरी जाऊन त्यांना व कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घर विकून पैसे देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्नही केला. तसेच शाळेत जाऊन धमकावले होते. (nashik crime)

Teacher beaten by moneylender
Dhule Murder : पिता पुत्राचा दुहेरी खून, माजी नगराध्यक्षासह 12 जण दोषी, 11 मार्चला सुनावणार‌ शिक्षा ...

संशयितांनी संगनमत करून शिक्षक अहमद यांच्याकडून जबरदस्तीने धनादेश घेऊन त्यावर बळजबरीने स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. तो धनादेश न्यायालयात सादर करीत अहमद यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तसेच संशयितांनी त्यांच्याकडून आतापर्यंत ८ लाख ५५ हजार ५०० रुपये उकळले. तर, १६ सप्टेंबर २०२१ रोजी संशयित शिंदे साथीदारांसह त्यांच्या घरी आला आणि धनादेशावर सही न केल्याने अहमद यांना त्याच्या कारमध्ये बळजबरीने बसवून मुक्तीधाम येथील त्याच्या कार्यालयात नेले. त्याठिकाणी डांबून ठेवत त्यांना बेदम मारहाण केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com