Nashik Crime : एकीकडे धर्मांतरावर लगाम घालण्यासाठी विधानसभेत विधेयक; दुसरीकडे मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी तरुणीवर बळजबरी

Nashik forced conversion case : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकीकडे धर्मांतराला लगाम घालण्यासाठी विधानसभेत विधेयक मांडले असतानाच नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Nashik forced conversion case,
Nashik forced conversion case, Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मांडलं आहे. या विधेयकावर विधानसभेत चर्चा झाली. राज्यात बळजबरी, फसवणूक आणि आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराला लगाम घालण्यासाठी विधानसभेत हे विधेयक मांडण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

तसेच या विधेयकातील महत्त्वाच्या बाबी सांगताना त्यांनी, हे विधेयक कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात नसून, सर्व धर्मांना समान लागू असेल आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले. एकीकडे राज्य सरकार धर्मांतरविरोधी विधेयक सादर केले असतानाच दुसरीकडे बळजबरी धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.

नाशिकमध्ये १९ वर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी बळजबरी करत वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन नाशिकच्या इगतपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पुढच्या चार तासांमध्येच पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात देखील घेतलं आहे.

Nashik forced conversion case,
Nashik Kumbh Mela : पंकज भुजबळांचा तारांकित प्रश्न, एकनाथ शिंदेंचं उत्तर ; कुंभमेळ्यापूर्वीच 'त्या' प्रकल्पाची क्षमता वाढवणार

मुस्तफा सलीम शेख असे संशयिताचे नाव असून, तो नाशिकच्या शालिमार येथील कपड्याच्या दुकानात सेल्समनचे काम करतो. रामनगर, पेठ रोड येथे तो राहतो. त्याच्या विरोधात पीडित तरुणी अल्पवयीन असल्याने पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीने पीडितेला लग्न करण्यासाठी तसेच धर्मांतरासाठी धमकी दिली होती. १२ डिसेंबर २०२५ व ६ जानेवारी २०२६ ला नाशिकमधील कपालेश्वर मंदिर परिसरात त्यासाठी त्याने तरुणीला बोलावले होते. न आल्यास माझ्या मामाला सांगून तुझ्या सर्व कुटुंबाला ठार करेल, अशी धमकी दिली. वेळोवेळी अशा धमक्या दिल्या जात असल्याने तरुणी तणावात होती.

पीडित अल्पवयीन तरुणीने याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली असून, संशयित मुस्तफा शेख याने चार वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून स्वतःची ओळख 'सोनू' अशी करून देत तो बौद्ध समाजाचा असल्याचे खोटे सांगितले होते. मात्र, काही काळानंतर त्याचे खरे नाव मुस्तफा शेख असल्याचे आणि तो मुस्लिम समाजाचा असल्याचा उलगडा झाला. त्याने पीडितेवर धर्मांतर करण्यासाठी प्रचंड दबाव टाकला होता. या सर्व प्रकारामुळे पीडित युवती मानसिक दबावाखाली होती.

Nashik forced conversion case,
MHADA Scam Nashik : नाशिकची बिल्डर लॉबी हादरली : म्हाडा घोटाळ्यातील बड्या व्यावसायिकाला बेड्या; कारवाईच्या भीतीने काहीजण पसार

इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर २३ मार्च २०२२ रोजी पीडिता अल्पवयीन असताना संशयिताने इगतपुरी येथील बारा बंगला परिसरात तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पुन्हा ११ व १८ जानेवारी २०२६ रोजी देखील पीडितेचे आई-वडील घरी नसताना संशयिताने पीडितेच्या घरात घुसून चॉकलेटद्वारे गुंगीचे औषध देऊन बळजबरीने अत्याचार केला, तसेच कुणाला सांगितल्यास ठार करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com