
Nashik News : नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील सातपीर दर्ग्यावर नाशिक मनपाने केलेल्या अतिक्रमण कारवाईची पाहणी करण्यासाठी कॉंग्रेसचे माजी खासदार हुसैन दलवाई आज नाशिकमध्ये आले होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी हुसैन दलवाई यांना अडवलं व ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे नाशिक दर्गा प्रकरण आता चांगलच तापलं आहे.
नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा पाडकामावेळी याठिकाणी दंगल झाली. मध्यरात्री दर्ग्याचे अतिक्रमण काढण्याचे काम सुरु केल्यावर पोलिसांवर जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली होती. दरम्यान, राजकीय नेत्यांना या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात पाहणीसाठी गेलेल्या दलवाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दर्ग्यावर केलेल्या अतिक्रमण कारवाईची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कॉंग्रेस नेते हुसैन दलवाई यांना गंगापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यांना नंतर सोडून दिले जाईल अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान दलवाई यांना माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, या परिसरात नेमके काय घडले होते हे पाहण्यासाठी मी आलो होतो. मला पोलिसांकडून आडवण्यात आलं. पाहणी करु दिली नाही. मी तिथे कोणतीही घोषणाबाजी केली नाही. साडेतीनशे वर्षांची ती दर्गा होती. ती हटवण्याचे कारण काय? ते हिंदू आणि मुस्लिमांचे ऐक्य आहे. त्या दर्गेचे दोन ट्रस्ट हिंदू आहेत. तो वाद निर्माण केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
दरम्यान दलवाई यांनी नाशिक पोलिसांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, पोलिसांचे म्हणणे आहे की, तुम्ही गेल्यानंतर इतरही लोक तिथे जातील. मग त्यांना आडवावं. माझा जाण्याचा काय प्रश्न आहे? माझे चरित्र सगळ्यांना माहिती आहे. मी काही दंगे करणारा माणूस नाही. जे दंगे करतात त्यांना तुम्ही संरक्षण देतात, त्यांचे सगळे ऐकतात. त्यांच्यामुळेच ही गडबड झाल्याचे दलवाई म्हणाले.
येथील आमदार सगळ्या दर्ग्यांना थडगं म्हणून संबोधतात. हे चुकीचे आहे. थडंग आणि दर्गा यात फरक आहे. थडगं काढून तिथे हनुमानाचे मंदिर बांधू असं त्या म्हणतात. तुम्ही त्यांना अटक केली पाहीजे. पोलिसांमध्ये हिंमत असेल तर तुम्ही ते करा मला कशाला अटक करताय असे आव्हानच त्यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.