Nashik Politics : नाशिकध्ये ठाकरे बंधूंना भाजकडून मोठा धक्का, ठाकरेंच्या दोन माजी महापौरांना लावलं गळाला

Thackeray Brothers setback : मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जाहीर होताच नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना भाजपने मोठा धक्का दिला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंचे दोन माजी महापौर भाजप प्रवेश करणार आहेत.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जाहीर झाली. त्या घोषणेनंतर लगेचच नाशिकमध्ये भाजपने ठाकरे बंधूंना मोठा धक्का दिला. ठाकरेंचे दोन माजी महापौरांनी पक्ष सोडला.

महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र नाशिक शहरात भाजपचे इनकमिंग थांबायला तयार नाही. एकीकडे भाजपचे इच्छुक अस्वस्थ आहेत. दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांचे डावपेच सुरूच आहेत.

मंत्री महाजन यांनी बुधवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का दिला. राज ठाकरेंचे माजी महापौर यतीन वाघ आणि उद्धव ठाकरेंचे माजी महापौर विनायक पांडे हे आज भाजप प्रवेश करणार आहेत. हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला निर्णायक धक्का मानला जातो.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Yatin Kadam : निफाडमध्ये यतीन कदम नावाच्या नव्या नेतृत्वाचा उदय, आजी-माजी आमदार अस्वस्थ

दुसरीकडे काँग्रेस पक्षातही गळती थांबायला तयार नाही. वीस वर्ष काँग्रेसचे नगरसेवक आणि महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती शाहू खैरे यांनी धक्कादायक निर्णय घेतला. ते आज भाजप प्रवेश करतील. काँग्रेस पक्षात निष्क्रिय आणि प्रभावहीन शहराध्यक्षांमुळे आता एकही माजी नगरसेवक उरलेला नाही.

माजी महापौर विनायक पांडे यांनी केलेला भाजपप्रवेश अनेकांना धक्का देणारा ठरला आहे. मध्य मतदारसंघातील राजकीय डावपेच म्हणून त्याकडे पाहिले जाते. भाजपच्या निवडणूक प्रमुख व आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र या पक्षप्रवेशाला विरोध केला आहे.

मावळत्या महापालिकेत काँग्रेसचे सहा नगरसेवक होते. यातील चार नगरसेवकांनी यापूर्वीच पक्षाला राम राम ठोकला आहे. आता काँग्रेसच्या माध्यमातून विविध पदे उपभोगलेल्या शाहू खैरे यांनाही नगरसेवक पद दळमळीत वाटू लागले होते. त्यांची एकाच वेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि भाजपशी चर्चा सुरू होती.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Dada Bhuse Politics : भाजपच्या संकटमोचकांवर शिवसेनेचे 'दादा' ठरले वरचढ, कुंभमेळा नगरीतूनच केलं हद्दपार..

बुधवारी शिवसेना ठाकरे पक्षाशी चर्चा अयशस्वी झाली. नंतर त्यांच्या प्रभागातून इच्छुक असलेल्या माजी महापौर विनायक पांडे यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी श्री पांडे यांनी वेगळा डाव टाकला. आता श्री खैरे आणि पांडे यांचे चिरंजीव हे भाजपचे उमेदवार असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com