Arjun Khotkar News: निवडणूक आयोग आणि केंद्रीय यंत्रणा किरकोळ रक्कमेसाठी खटले दाखल करतात. ज्याच्याकडे पैसे सापडले, त्यांना हैराण करून सोडतात. मात्र नाशिक आणि धुळे येथे घडलेल्या दोन प्रकरणांबाबत या यंत्रणा मौन आहेत.
विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवार अहिरराव होत्या. त्यांच्या मतदारसंघात वाटण्यासाठी रोकड आल्याची तक्रार होती. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मसुद जिलानी यांनी त्याचा पाठपुरावा केला.
यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली. या चौकशी नाशिकच्या रेडिसन ब्लू येथे उमेदवाराच्या बहिणीसह नेत्याकडे १.९८ कोटी रुपये सापडले होते. ही रक्कम शासकीय खजिन्यात जमा करण्यात आली.
धुळे येथील सार्वजनिक कामांच्या तपासणीसाठी समितीचा दौरा झाला. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष होते. आमदार खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने असलेल्या विश्रामगृहातील कक्षात १.८४ कोटी रुपये जप्त करण्यात आले.
धुळे येथील प्रकरणात माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांसह सर्व यंत्रणांना माहिती दिली. हे स्वतः खोली बाहेर तळ ठोकून बसले होते. त्यानंतर कारवाई करून रक्कम जप्त करण्यात आली.
धुळे येथील प्रकरणात आरोप असलेले शासकीय कर्मचारी किशोर पाटील यांच्यावर अद्याप कोणतेही कारवाई झालेली नाही. किशोर पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने ही प्रकरण जैसे थे आहे. मात्र संबंधित पैसे कोणाचे आणि कसे आले याचा खुलासा झालेला नाही.
देवळाली मतदारसंघात हॉटेल रॅडिशन येथे जयंत साठे या ठाणे येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडे १.९८ कोटी रुपये सापडले. त्या पैशांचा स्त्रोत काय?. ते कशासाठी आणले होते? या संदर्भात प्राप्तिकर विभागाला साठे कोणतेही प्रमाण आणि स्पष्टीकरण देऊ शकलेले नाहीत.
नाशिकच्या ट्रेझरीत रेडिसन हॉटेल येथील पैसे जमा करण्यात आले आहे. पवारंवार पाठपुरावा करूनही याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रकरणाचा पाठपुरावा करणारे मसूद जिलानी यांनी नुकतेच विभागीय महसूल आयुक्तांना निवेदन दिले आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार पत्र देऊनही कारवाई झालेली नाही.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिलेदारांकडे कोट्यावधींची रक्कम सापडली. मात्र याबाबत सरकारी यंत्रणांची भूमिका हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी आहे. त्यामुळे विरोधी पक्ष या प्रकरणावर काय भूमिका घेणार? हा चर्चेचा विषय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.