Nashik Zilla Parishad : मंत्री-आमदारांना जुमेना, सगळ्यांनी हात जोडले ; मग काय आरोग्य मंत्र्यांनीच दिला नाशिकच्या अधिकाऱ्याला निलंबनाचा दणका

Prakash Ambitkar, Nashik health officer suspension : जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांनी डॉ. मोरे कुणालाही जुमानत नाहीत. त्यांच्या कामकाजाबाबत लेखी तक्रारी केल्या होत्या.
Maharashtra Health Minister Prakash Abitkar during
Maharashtra Health Minister Prakash Abitkar sarkarnama
Published on
Updated on

Nashik health officer suspension : जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांना शासनाने निलंबित केले आहे. त्यांच्याविषयी प्राप्त तक्रारींच्या आधारे आरोग्य विभागाने ही कारवाई केल्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मोरे यांच्या कामकाजाबाबत गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी तसेच कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. कामे वेळेत न करणे, कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देणे, कर्मचाऱ्यांचा छळ करणे, कामावर नियमित हजर न राहणे, आरोग्य केंद्रांना भेटी न देणे तसेच बदल्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी त्यांच्याविरोधात करण्यात आल्या होत्या.

राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी नुकताच नाशिक जिल्हा दौरा केला. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना सरप्राईज व्हिजीट करत येथील सुविधांची पाहणी केली. कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावेळी जिल्ह्यातील सर्वच आमदार, लोकप्रतिनिधींनी मंत्री आंबिटकर यांच्याकडे डॉ. मोरे यांच्या वर्तणुकीविषयी तक्रार करत त्यांची बदली करण्याची मागणी केली होती.

Maharashtra Health Minister Prakash Abitkar during
Nashik Zilla Parishad : स्वतःपासूनच सुरुवात करणार, सीईओ ओमकार पवारांचा पहिलाच उपक्रम हृदयाला भिडणारा

जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांनी डॉ. मोरे यांच्या कामकाजाबाबत लेखी तक्रारी केल्या होत्या. डॉ. मोरे कामे ऐकत नाहीत, जबाबदारी झटकतात आणि कर्मचाऱ्यांना त्रास देतात, अशा तक्रारी थेट आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या होत्या.

वाढत्या तक्रारींमुळे आरोग्य विभागाने १५ दिवसांपूर्वी त्यांना नोटीस बजाविली होती. त्यावर डॉ. मोरे यांनी खुलासा देखील केला. मात्र, हा खुलासा समाधानकारक नसल्याकारणाने त्यांचे निलंबन करण्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले.

महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार डॉ. मोरे यांना निलंबित करण्यात आले. महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९ मधील नियम ४ (१) (अ) अन्वये ही कारवाई करण्यात आली

Maharashtra Health Minister Prakash Abitkar during
नाशिक महापालिकेच्या लोगोमध्ये नारोशंकराची घंटा का आहे?

निलंबन कारवाईनंतर शुक्रवारी नाशिक जिल्हापरिषदेतून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. दरम्यान, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र बागूल यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत डॉ. बागूल हे त्यांच्या मूळ जबाबदाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचाही अतिरिक्त कार्यभार पाहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com