Nashik Drought: दुष्काळ उपाययोजना आणि पंचनाम्यात नाशिक राज्यात पिछाडीवर; कृषिमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश!

Agriculture Minister Dattatray Bharane to order faster action ahead of the central team’s visit: नाशिक विभागात दुष्काळी नुकसानीचे पंचनामे केवळ २२ टक्के पूर्ण झाल्याने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कामाला वेग देण्याचे आदेश दिले. केंद्रीय पथकाच्या पाहणीपूर्वी प्रशासनाची धावपळ वाढली आहे.
Agriculture Minister Dattatray Bharne
Agriculture Minister Dattatray Bharnesarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Drought News: राज्यात पावसाच्या अभावामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात दुष्काळी उपाय योजना करण्यावर प्रशासन भर देत आहे. यासंदर्भात कृषिमंत्र्यांकडून नियमितपणे आढावा घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर येत्या चार-पाच दिवसात केंद्रीय पथक महाराष्ट्रातील दुष्काळाची पाहणी करणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यापूर्वीच नाशिकसह खानदेशातील काही भागांचा दौरा त्यांनी केला होता. राज्यातील दुष्काळी उपाय योजनांसाठी सरकारचे विविध मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत.

राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नुकसानीचे पंचनामे हा प्राधान्याचा विषय आहे. त्यामुळे येत्या 10 ऑक्टोबर पूर्वी राज्यातील सर्व विभागांमध्ये दुष्काळाची पंचनामे पूर्ण करावे. नुकसानीचे पंचनामे सादर केल्यावर तातडीने मदतीबाबत कार्यवाही होणार आहे.

राज्यात विविध विभागातील दुष्काळाचे पंचनामे करण्यासाठी नियमितपणे आढावा घेतला जात आहे असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. सध्या मराठवाड्यात सर्वाधिक ६८ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पुणे विभागात 30 तर नाशिक विभागात सर्वात कमी 22 टक्के पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाला येत्या आठवड्याच्या आत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Agriculture Minister Dattatray Bharne
NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदारांचे मतदार संघ दुष्काळाच्या यादीतून वगळले, आमदारांमध्ये अस्वस्थता

केंद्र शासनाने राज्यातील दुष्काळाबाबत मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील समिती नियुक्त केली आहे. ही समिती येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. कृषी विभागाने केंद्र शासनाकडे दुष्काळी उपाय योजनांसाठी १७ हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे.

Agriculture Minister Dattatray Bharne
Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँकेत भाजप आमदार सुरेश खाडे रिंगणातून बाहेर, खासदार विशाल पाटील यांच्या पत्नीचाही अर्ज बाद

राज्यातील 265 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक विभागातील 10 तालुक्यांचा समावेश आहे. पाच तालुके वगळण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड या तालुक्यांची लवकरच दुष्काळी तालुके म्हणून घोषणा होणार आहे. राज्यात 19 तालुके नव्या निकषानुसार दुष्काळी तालुक्यात जाहीर करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री भरणे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com