NMC Election News: महापालिका निवडणूक मतदारयाद्यांचा घोळ नव्हे तर घोटाळाच उघड झाला आहे. विरोधी पक्षांनी याबाबत आवाज उठवला होता. आता सत्ताधारी नेतेही सावध झाले आहे. त्यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदारयाद्या देशभर टिकेचा विषय ठरला आहे. नाशिक महापालिकेच्या मतदार याद्या देखील त्याला अपवाद नाहीत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांनी त्यावर गंभीर आक्षेप घेतले आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उपनेते अजय बोरस्ते, संपर्क प्रमुख विलास शिंदे, महानगर प्रमुख प्रवीण तीदमे, शिवाजी भोर आधी पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शहराची प्रभाग निहाय मतदार यादी निर्दोष करावी. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी उपनेते बोरस्ते यांनी धक्कादायक माहिती दिली. घरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये दहा हजाराहून अधिक मतदार अनोळखी आहेत. ही नावे शहराबाहेरची आहेत. मात्र अनेक निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या सुमारे आठ हजार मतदारांची नावे गायब झाली आहेत.
नाशिक महापालिकेच्या मतदार यादीत २०१७ च्या तुलनेत ७० ते ८० टक्के मतदारसंख्या वाढली आहे. ही संशयास्पद आहे २०१७ ला मतदान केलेल्या असंख्य मतदारांची नावे यादीत नाहीत वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी मयत झालेल्या मतदारांची नावे मात्र कायम आहेत.
मतदारांना आपली नावे शोधण्यात अडचणी येतात. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ कार्यरत नाही. तांत्रिकदृष्ट्या अनेक दोष मतदार यादीत आहेत. महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून २००२ पासून उपलब्ध माहितीच्या आधारे यादी बनविल्याचा दावा प्रशासन करते. प्रत्यक्षात तसे कुठेही आढळलेले नाही.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी निर्दोष आणि प्रत्येक प्रभागाची काळजीपूर्वक मतदारांची संपर्क करून तयार केलेली यादी करावी. बाबत बीएलओ आणि अन्य यंत्रणा सक्रिय कराव्यात. यादीतील दूर केल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये असा इशारा यावेळी देण्यात आला.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.