Nashik FDA Action : टक्कलवाल्यांना केसांचे स्वप्न दाखवले; FDA'ची नाशिकच्या कॉलेजरोड परिसरात कारवाई; ५० लाखांचे तेल जप्त!

FDA Takes Action Against Ayurvedic Hair Oil in Nashik : टक्कल असलेल्या व्यक्तींना पुन्हा केस उगवण्याचे आमिष दाखवून आयुर्वेदिक तेलाची सोशल मीडियावर जाहिरात करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे.
Maharashtra FDA Action
Maharashtra FDA Action sarkarnama
Published on: 
Updated on: 

FDA Takes Action Against Ayurvedic Hair Oil in Nashik : सोशल मीडियावर जाहिराती करून टक्कल असलेल्या व्यक्तींना केस पुन्हा उगवण्यासह केसांची वाढ होण्याचे आमिष दाखवले जात होते. या आयुर्वेदिक तेलाच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत प्रशासनाने १०० मिली क्षमतेच्या ५ हजार ४० बाटल्या जप्त केल्या असून, जप्त केलेल्या तेलाची एकूण किंमत ५० लाख ३४ हजार ९६० रुपये आहे.

अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कॉलेज रोड परिसरातील विसेमळा येथील सहजीवन कॉलनीतील एका इमारतीत मे. व्ही. एस. न्यू फॅशन झोन या नावाने ब्युटी सलून आणि इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय चालवला जात होता. या सलूनच्या माध्यमातून सोशल मीडियावर केसांसाठीच्या तेलाची जाहिरात केली जात होती. यासंदर्भात विभागाला माहिती मिळाल्यानंतर संबंधित उत्पादनाची पडताळणी करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत संबंधित उत्पादनाच्या लेबलवर केवळ 'मार्केटेड बाय मे. व्ही. एस. न्यू फॅशन झोन, नाशिक' असा उल्लेख आढळला. तसेच बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख आणि १०० मिली बाटलीची किंमत ९९९ रुपये नमूद करण्यात आली होती. मात्र, उत्पादन करणाऱ्या कंपनीचे नाव, पत्ता तसेच उत्पादन परवान्याचा तपशील लेबलवर नव्हता.

Maharashtra FDA Action
Tukaram Mundhe: गोकुळचा निकालावर खरंच तुकाराम मुंढेंचा प्रभाव होता? FDA आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

संस्थेचे मालक योगेश भगत यांच्याकडे या आयुर्वेदिक उत्पादनाच्या निर्मिती किंवा विक्रीसंदर्भातील आवश्यक उत्पादन परवाना आणि कायदेशीर परवानग्या नसल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत प्रशासनाने तेलाचा साठा जप्त केला आहे. तपासातून समोर येणाऱ्या बाबींनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.

Maharashtra FDA Action
FDA Raid : दिवाळीआधी FDA ची धडक कारवाई : कोट्यवधींचे चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स जप्त; लेबलिंगमध्ये दोष, दर्जाबाबत संशय

आवाहनाला बळी पडू नये

टक्कल घालवणे, पुन्हा केस उगवणे, वजन कमी करणे असे भ्रामक दावे करणाऱ्या सोशल मीडियावरील जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये. कोणतेही औषध खरेदी करताना त्याच्या लेबलवर उत्पादकाचे नाव, पूर्ण पत्ता व उत्पादन परवाना क्रमांक नमूद असल्याची खात्री करावी असे आवाहन एफडीएने केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.