Nashik FDA Action : भोंदूबाबाशी संबंध पडले महागात! नाशिकमधील बोगस औषध कंपनीला FDA चा दणका, परवाना कायमचा रद्द

Shivnath Ayurved, Mohan Puri : अन्न व औषध प्रशासनाने मोहन पुरी हा नियमबाह्य औषध निर्मिती करत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाने जायंगाव येथे छापा टाकून कारवाई केली.
Nashik FDA Action
Mohan PuriSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : सिन्नर तालुक्यातील जायगांव येथील डॉ. मोहन पुरी यांच्या शिवनाथ आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनीचा औषध निर्मितीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA)कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भोंदूगिरी व बेकायदेशीर औषध निर्मिती विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने पाठपुरावा केला होता.

अंनिसच्या राज्य सचिव अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी केलेल्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने ही धडक कारवाई केली आहे. अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी संगमनेर पोलिस ठाण्यात बहुचर्चित भोंदू राजेंद्र गडगेबाबा विरोधात तक्रार दिली होती, त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यात पुढे तपासात सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील डॉ. मोहन पुरी हाही भोंदू गडगेबाबाचा निकटवर्तीय व हस्तक असल्याचे समोर आले होते.

मोहन पुरी आपल्या कंपनीत बनवलेली ही बोगस औषधे भोंदू गडगेबाबाला देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. अॅड. पगार -गवांदे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे डॉ. मोहन पुरी हा नियमबाह्य व संशयास्पद पद्धतीने औषध निर्मिती करत असल्याची तक्रार केली होती.

Nashik FDA Action
FDA recruitment : तुकाराम मुंढेंच्या विभागातील पदांच्या भरती परीक्षेत पेपरफुटीचा आरोप; MPSC ने दिला कडक इशारा

त्या तक्रारीच्या आधारे एफडीएने सिन्नर तालुक्यातील मोहन पुरी यांच्या जायगाव येथे असलेल्या मे. शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट कंपनीवर छापा टाकून प्रत्यक्ष तपासणी केली. या तपासणीतअत्यंत अस्वच्छ वातावरणात औषधे तयार केली जात असल्याचं लक्षात आलं. तसेच, औषध निर्मितीचे निकष पाळले जात नसल्याचे, उत्पादन प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे व औषध व प्रशासन कायद्यातील अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले. या निष्कर्षाच्या आधारे अन्न व औषध प्रशासने डॉ. पुरी यांना २ जून २०२६ रोजी कारणे दाखवा नोटिस बजावून स्पष्टीकरण मागवले होते. त्यानुसार मोहन पुरी यांनी आपले लेखी स्पष्टीकरण सादर केले होते.

त्यानंतर या याप्रकरणी २५ जून २०२६ रोजी मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे तंत्र अधिकारी तथा अनुज्ञप्ति अधिकारी यांनी प्रत्यक्ष सुनावणी घेतली. सुनावणीत, नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने ३० जून २०२६ रोजी अंतरिम आदेश पारित केला. त्यानुसार सदर औषध निर्मितीचा परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Nashik FDA Action
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढे यांचा दणका! FDA मध्ये येताच वाढला कारवाईचा वेग; भेसळ नमुना तपासणीत 462% उसळी

नाशिक परिमंडळ -२ चे सहाय्यक आयुक्त ( औषधे) व अनुज्ञप्ति अधिकारी चं. अ.मोरे यांनी याविषयीची अधिकृत माहिती अॅड. रंजना पगार -गवांदे यांना पत्राद्वारे कळविली आहे. अॅड. रंजना पगार-गावंदे यांच्यासोबतच अंनिसचे नाशिक स्थिती पदाधिकारी, डॉ.टी. आर. गोराणे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, कृष्णा चांदगुडे यांनी देखील यासंदर्भात पाठपुरावा केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com