Nashik IT Company Case : त्या IT कंपनीच्या महिला HR हेड'ला थेट पोलिस कोठडी, अत्याचार व धर्मांतर प्रकरणाला धक्कादायक वळण

Nashik IT Company HR Head Arrest : पीडित हिंदू तरुणींनी या महिला एचआरकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. मात्र महिला एचआरने तक्रारींकडे दुर्लक्ष केलं त्यातूनच या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे सांगितले जात आहे.
Nashik IT Company HR Head Arrest
Nashik IT Company HR Head ArrestSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News : नाशिकमधील एका मल्टिनॅशल आयटी कंपनीत हिंदू कर्मचारी महिला व मुलींवर लैगिंक अत्याचार आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ८ हिंदू मुलींनी व एका पुरुषाने तक्रार दिल्यानंतर तब्बल ९ गुन्हे दाखल झाले आहेत.

या प्रकरणात सहा मुस्लीम संशयित तरुणांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. मात्र आता याप्रकरणी कंपनीची पुणे येथील महिला एचआर हेड अश्विनी चैनानी हिला एसआयटी पथकाने अटक केली आहे. न्यायालयाने तिला १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलांनी वारंवार ई-मेलद्वारे तक्रार करूनही एचआर हेड चैनानी हिने त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. ‘कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असं होत राहतं... असे उत्तर देत प्रकार झाकण्याचा प्रयत्न केल्याचा तिच्यावर आरोप आहे. यातून तीने संशयितांना पाठीशी घातल्याची शक्यता तपासली जात आहे. एचआर हेडने दुर्लक्ष केल्याचेच या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे सांगितले जात आहे.

Nashik IT Company HR Head Arrest
Nashik Crime : ‘कॉर्पोरेट कंपनीत असं होत राहतं...’ पीडित हिंदू तरुणींनी मेल केला पण एचआरने दुर्लक्ष केलं... तपासात धक्कादायक माहिती उघड

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांना काल न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची रवानगी नाशिक सेंट्रल जेलला करण्यात आली आहे. मात्र एसआयटी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. तर महिला एचआर हेडला पोलिस कोठडी सुनावली. आतार्यंत एकुण सात जणांना याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातील महिला संशयित निदा खान अद्याप फरार आहे. (Nashik Crime)

Nashik IT Company HR Head Arrest
Nashik Crime : लंगडत लंगडत बाहेर आला अन् हात जोडत तो 'नारा दिला'.. अत्याचारी रविंद्र एरंडेला नाशिक पोलिसांनी दाखवला हिसका (Video)

याप्रकरणातील आरोपींकडून महिलांवर अत्याचार करणे, नमाज पठणाची सक्ती करणे आणि इच्छेविरुद्द मांसाहार खाउ घालण्याचे गंभीर प्रकार घडले. या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिक पोलिसांनी अत्यंत गोपनीय मोहीम राबवली. एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह सात महिला पोलिसांनी वेशांतर करुन कंपनीत आपला वावर ठेवला. दोन आठवडे तिथे घडणाऱ्या घटनांवर पाळत ठेवत संशयितांना अटक केली. संशयितांनी पाडित तरुणांशी केलेले गैरवर्तन व अश्लील चाळे महिला पोलिसांनी प्रत्यक्ष पाहिले. त्यानंतर शिताफीने संशियतांच्या मुसक्या आवळल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com