

Nashik IT company religious conversion case : नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत हिंदू कर्मचारी महिला व मुलींचे लैगिंक शोषण व सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कंपनी व्यवस्थापनाने नाशिकमधील प्रोजेक्ट बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
कंपनीचे नाशिक मधील युनिट बंद करुन कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्याला शीप्ट करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एकतर मुंबई-पुण्याला शीप्ट व्हावं लागणार आहे किंवा ज्यांना शीप्ट होणे शक्य नसेल त्यांना नवीन नोकरी शोधावी लागणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांसमोर स्थलांतर अथवा बेरोजगारीचा प्रश्न उभा राहिला आहे.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मागील चार वर्षांपासून काही संशयितांकडून नोकरीच्या शोधात असलेल्या हिंदू महिला व मुलींना लक्ष्य करून त्यांचे लैंगिक शोषण करण्यात येत होते. संशयितांकडून महिलांवर अत्याचार करणे, नमाज पठणाची सक्ती करणे, मासांहार खाऊ घालणे अशा प्रकारचा विचित्र छळ केला जात होता. यासोबतच त्यांच्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकला जात असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
आठ पीडित हिंदू महिला-मुली व एका पुरुषाने यासंदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी आतापर्यंत ९ गुन्हे दाखल झाले असून तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. संशयितांनी एका पुरुषाचे जबरदस्तीने धर्मांतर करुन घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून याप्रकरणी सहा संशयितांसह कंपनीच्या एचआर प्रमुख अश्विनी चैनानी हिला अटक करण्यात आली आहे.
या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे रॅकेट असल्याचा संशय असून केंद्रीय तपास यंत्रणाकडून देखील या प्रकरणाचा गोपनीय तपास केला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हे प्रकरण गंभीर वळणावर घेल्याचे पाहाता कंपनी व्यवस्थापनाने नाशिकमधील प्रोजेक्टला टाळे लावण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सध्या कर्मचाऱ्यांना कंपनीत येण्यास मनाई करण्यात आली असून, कामकाज जवळपास ठप्प झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.