Nashik Voter List Scam : खोलीत राहतात तिघे, मतदार यादीत 813 व्यक्ती! निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, संकेतस्थळ हॅक की घोटाळा?

Election Commission Maharashtra : नाशिकमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका छोट्या खोलीत 813 मतदार आढळले. हा घोटाळा उघडकीस आल्याने निवडणूक आयोग काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Nashik Voter List Scam
Nashik Voter List ScamSarkarnama
Published on
Updated on

Nashik voters scam: नाशिकमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका छोट्या खोलीत 813 मतदार आढळले. हा घोटाळा उघडकीस आल्याने निवडणूक आयोग काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रातील मतदार याद्या सदोष आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे. राज्य शासन याबाबत दुरुस्ती करण्याऐवजी थट्टा करण्यात मशगुल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच विरोधी पक्षांची थट्टा केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आदी नेत्यांनी काल निवडणूक आयोगाची भेट घेतली. मतदार यादी दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला आयोगाचा प्रतिसाद मिळाला नाही.

या संदर्भात राज्याचे निवडणूक आयुक्त चौकलिंगम यांनी मतदार याद्या दुरुस्त करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत असे स्पष्ट केले होते. आयोगाने जुलै महिन्यात परिपत्रक काढले. त्यात सामूहिक दुरुस्तीच्या तक्रारी स्वीकारू नयेत असे स्पष्ट केले आहे.

Nashik Voter List Scam
NCP Politics : ऐन निवडणुकीच्या तोंडावर 'या' तीन जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली...

एकंदरच निवडणूक आयोगाचा सदोष मतदार याद्या दुरुस्त होऊ नये असा दृष्टिकोन तर नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली. त्यात शहरातील मध्य मतदारसंघात 71,940 पश्चिम 1,09,690 आणि पूर्व 1,13,351 मतदार दुबार आणि नियमबाह्य आढळल्याचा पुराव्यासह पेन ड्राईव्ह सादर केला होता.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सक्रिय झाला आहे. कार्यकर्त्यांनी तीन महिने मतदार याद्यांचा अभ्यास केला. ठिकठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यातून मतदार याद्यांचा घोटाळा उघडकीस आणला.

Nashik Voter List Scam
Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांनी राडा घातलेलं आमदार निवासातील कॅन्टीन फुकट बदनाम झालं... प्रशासनाकडून जेवणाला क्लिनचीट

मतदार याद्यांच्या घोटाळ्यात सर्वोच्च घोटाळा म्हणून नाशिक शहरातील नानावली भागातील घर क्रमांक 3829 या साई सखा पार्क घरात एकच खोलीत 813 मतदार आढळले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या संदर्भात घरमालक लक्ष्मणराव मांडे यांनी आपल्या घरात फक्त तिघे राहतात.

त्यात स्वतः मांडे (80), पत्नी मीरा (70) आणि मुलगा उमेश (38) यांचा समावेश आहे. आमच्या घरात गेल्या दहा वर्ष कधीच अन्य कोणी राहिलेले नाही. मतदार यादीत एवढे मतदार कसे आले याचे मलाही आश्चर्य आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com