Nashik Kumbh Mela 2027 : केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार पथक कुंभनगरी नाशिकमध्ये; सिंहस्थ तयारीचा घेतला आढावा!

Central Government Economic Advisory Team Visits Nashik Kumbh Mela Authority : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक सल्लागार पथकाने नाशिक दौरा केला. यावेळी कुंभमेळ्याचे नियोजनासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Simhastha Kumbh MelaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Kumbh Mela 2027 : भारत सरकारच्या आर्थिक सल्लागार पथकाने रविवारी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट देऊन आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी करण्यात येत असलेले नियोजन, प्रशासकीय तयारी आणि विविध यंत्रणांमधील समन्वय याबाबत चर्चा करण्यात आली.

या पथकामध्ये आर्थिक सल्लागार डॉ. अनुराधा गुरु, डॉ. रोझ मेरी के. अब्राहम आणि संचालक कोकिला जयराम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी या पथकाचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी प्राधिकरणाच्या कार्यालयात संवादात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी सुरू असलेल्या तयारीची माहिती पथकाला देण्यात आली. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या धार्मिक सोहळ्याचे नियोजन करताना आवश्यक असलेली प्रशासकीय व्यवस्था, विविध विभागांमधील समन्वय आणि शहराची सज्जता या विषयांवर यावेळी विचारविनिमय झाला.

Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Kumbh Mela Fund : आधी दोन, मग पाच अन् आता सात कोटी! नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील आखाड्यांच्या निधीत वाढ, जुलैपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आव्हान

नाशिकच्या आर्थिक क्षमतेची आणि विविध क्षेत्रांतील विकासाच्या संधींची माहिती घेण्यासाठी आयोजित व्यापक आर्थिक अभ्यास दौऱ्याचा हा एक भाग होता. या दौऱ्यामध्ये कृषी क्षेत्र, प्रगत उत्पादन उद्योग, जीवन विज्ञान आणि उदयोन्मुख उद्योगांच्या क्षेत्रांतील संधींचा अभ्यास करण्यासाठी विविध कृषी व औद्योगिक आस्थापनांना भेटी देण्यात आल्या.

Nashik Simhastha Kumbh Mela
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात नगरसेवकांची गैरसोय, विषय थेट महासभेत गाजणार?

कुंभमेळा आयुक्तांसोबत झालेल्या संवादातून पथकाला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनातील नागरी प्रशासनाची भूमिका आणि एवढ्या मोठ्या धार्मिक सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या नियोजनाची माहिती मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.