Nashik Kumbh Mela : गिरीश महाजनांना शह..भुजबळानंतर आता शिंदेंची कुंभ आखाड्यात एण्ट्री

Eknath Shinde entry, Girish Mahajan challenge : कुंभमेळ्याचे नियोजन कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन पाहत आले आहेत. पण आता भुजबळ व शिंदेंच्या एण्ट्रीने महाजनांची अस्वस्थता वाढू लागली आहे.
Girish-Mahajan-Eknath-Shinde.
Girish-Mahajan-Eknath-Shinde.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये २६- २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळा जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसा सत्ताधारी महायुतीमधील नेत्यांमधील वाद हळहळू वाढू लागल्याचं दिसत आहे. नाशिकमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. सुरुवातीपासून कुंभमेळ्याच्या नियोजनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन हे दोघेच होते. मात्र त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेत यात एन्ट्री केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता कुंभमेळ्याच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिकमध्ये पालकमंत्रीपदावरुन महायुतीत वाद सुरु आहे. कुंभमेळा व आगामी महापालिका निवडणूक पाहाता नाशिकच्या पालकमंत्रीपदाला विशेष महत्व आहे. तिथेही गिरीश महाजन यांचेच नाव आघाडीवर आहे. बरं त्यातल्या त्यात मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीतील सहकारी पक्ष आणि मंत्र्यांना कुंभमेळ्याच्या नियोजनापासूनही जाणीवपूर्वक अलिप्त ठेवल्याचा आरोप आहे. त्यासाठी सरकारने स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त केले आहे. मग अशात कुंभमेळ्याचे श्रेय एकट्या भाजपकडे नको जायला यादृष्टीने इतरही पक्ष आता कुंभमेळा नियोजनाच्या आखाड्यात उतरु लागले आहे.

राष्ट्रवादीचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच सिंहस्थ कुंभमेळ्याची बैठक घेतली, त्यादृष्टीने प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. त्यातून त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना शह दिला होता. या स्पर्धेतून महायुतीमधील कुणीही मागे हटायला तयार नाही. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही लवकरच कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

Girish-Mahajan-Eknath-Shinde.
Dada Bhuse : भाजपच्याही एक पाऊल पुढे, निवडणूक तयारीसाठी दादा भुसेंची खास रणनिती

भुजबळांनी स्थानिक मंत्री म्हणून मला आढावा घेण्याचा अधिकार असल्याचं सांगत यात उडी घेतली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता नगरविकास विभागाच्या आडून कुंभ नियोजनाची सूत्र हातात घेण्याचं ठरवलेलं दिसंत आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनात गोदावरी स्वच्छता आणि प्रदूषण मुक्तीला सुरुवातीपासून प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 1400 कोटी रूपयांच्या 3 योजनांच्या निविदा जाणीवपूर्वक नागपूर येथील काही कंत्राटदारांना मिळाव्यात याची सोय केल्याचा आक्षेप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या टप्प्यातील कामांना स्थगिती देण्यात यावी इतपर्यंत हस्तक्षेप केला.

Girish-Mahajan-Eknath-Shinde.
Chhagan Bhujbal : लेट एन्ट्री घेतलेल्या भुजबळांनी गिअर बदलला; कुंभमेळ्यातील क्लब टेंडरच्या चौकशीचे आदेश

दरम्यान आता भुजबळ व एकनाथ शिंदे यांच्या कुंभमेळ्यातील एण्ट्रीने भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची अस्वस्थता वाढू लागली आहे. त्यात पालकमंत्रीपदासाठीही भुजबळांनी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com