PMC Politics: पुणे शहरात महापौर चषक: निमंत्रणावरून उपमहापौर- महापौरांमध्ये रंगले 'नाराजीनाट्य'

Mayor Manjusha Nagpure Vs Deputy Mayor Parshuram Wadekar : पुणे शहरात महापौर चषकाचे कार्यक्रम सुरु असताना त्यामध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइंचे) उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रभागात कार्यक्रम असूनही निमंत्रण न दिल्याने त्यांचे नाराजीनाट्य रंगले आहे.
PMC Manjusha Nagpure And Parshuram Wadekar .jpg
PMC Manjusha Nagpure And Parshuram Wadekar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे शहरात महापौर चषकाचे कार्यक्रम सुरु असताना त्यामध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइंचे) उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रभागात कार्यक्रम असूनही निमंत्रण न दिल्याने त्यांचे नाराजीनाट्य रंगले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर महापौर मंजुषा नागपुरे यांनी वाडेकर यांच्याशी बोलून समजूत काढली.

महापौर चषक निमित्ताने शहरात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेच्या वार्षिक परीक्षा सुरु होण्याच्या तोंडावरच महापौर चषक आयोजित केले आहे. त्यामुळे कमी दिवसात ही स्पर्धा संपविण्यासाठी महापौर कार्यालय व क्रीडा विभागाची तारेवरची कसरत आहे. या स्पर्धेसाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च येत आहे.

दरम्यान, उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी येथे शरीरश्रेष्ठत्व स्पर्धा आयोजित केली होती. त्यासाठी भाजपच्या स्थानिक भाजपच्या नगरसेवकांना निरोप देण्यात आला. पण रिपाइंचे उपमहापौर वाडेकर यांना थेट निरोप देण्यात आला नाही. ऐनवेळी त्यांना या स्पर्धेचा निरोप देण्यात आला. भाजपकडून गृहित धरले जात असल्याने वाडेकर यांनी नाराजी व्यक्त केली.

वाडेकर म्हणाले,‘‘मी शहराचा उपमहापौर आहे, मला माझ्याच प्रभागातील कार्यक्रमाचे निमंत्रण अधिकृतपणे देण्यात आले नाही. भाजपच्या नगरसेवकांकडून ऐनवेळी मला फोन करून माहिती देण्यात आली, रिपाइं हा भाजपचा मित्रपक्ष आहे, आमचेही नगरसेवक आहेत. या सर्वांचा सन्मान राखला गेला पाहिजे.’’

PMC Manjusha Nagpure And Parshuram Wadekar .jpg
Baramati By Election: लक्ष्मण हाके बारामती पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरणार? युगेंद्र पवारांचं मोठं वक्तव्य

महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या,‘‘महापौर कार्यालयातून कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकाला निरोप दिला जात आहे. वाडेकर यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. तसेच महापौर कार्यालयात पूर्वी प्रोटोकॉल अधिकारी होते, कोणाला कोणते निरोप द्यायचे हे त्या अधिकाऱ्यांस माहिती होते.

पण सध्या प्रोटोकॉल अधिकारी नसल्याने निरोप देण्यात गडबड होत आहे. अन्य बैठका, कार्यक्रम यासंदर्भात हे प्रकार घडले आहेत. महापौर कार्यालयात अनुभवी अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज आहे. ही उणीव लवकर दूर केली जाईल.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com