
Nashik Kumbh Mela 2027 : प्रयागराज येथील कुंभमेळा पार पडल्यानंतर आता आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. २०२७ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा असून त्यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभागही त्यादृष्टीने सतर्क झाला आहे.
कुंभमेळ्यात लाखो भाविक येतील. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. त्यामुळे साहजिकच दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल. दूध भेसळयुक्त राहिल्यास भाविकांचे आरोग्य बिघडू शकते. म्हणून कुंभमेळ्यात दूध व दूग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औधष प्रशासनाकडून विशेष नियोजन केले जाणार आहे.
भाविकांना भेसळयुक्त दूध मिळू नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने एका यंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. दूधाची गुणवत्ता तपासण्यासाठी दूधाची रॅपिड टेस्ट करण्याचा विचार आहे. त्यादृीने अन्न व औषध प्रशासन (FDA) ने मिल्को स्कॅन व स्क्रीन यंत्रांच्या मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त महेश चौधरी यांनी दिली आहे.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो भाविक नाशिक नगरीत दाखल होतील. त्यामुळे दूध व दूग्धजन्य पदार्थांची मागणी वाढेल. त्यामुळे भाविकांना भेसळयुक्त दूध मिळण्याची शक्यता नाकारात येत नाही. नफा मिळवण्याच्या हेतूने दुधात भेसळ करून विकण्याचे प्रकार याधीही नाशिकमध्ये अनेकदा घडले आहेत. दूध संकलन केंद्रावरही असे प्रकार झाले असून अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई देखील करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मिल्को स्कॅन व स्क्रीन या यंत्राची मागणी शासनाकडे केली आहे. शासनाला तसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
"मिल्को स्कॅन" किंवा "स्क्रीन यंत्र" म्हणजे दुधाचे गुणधर्म तपासण्यासाठी वापरले जाणारे एक उपकरण आहे. या उपकरणाला "मिल्क ॲनालायझर" किंवा "दूध विश्लेषक" देखील म्हणतात. हे उपकरण दुधातील चरबी, प्रथिने, सॉलिड-नॉट-फॅट, लैक्टोज, घनता आणि इतर घटकांची माहिती देते. दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी हे उपकरण वापरले जाते, जेणेकरून दुधातील चरबी आणि प्रथिनेची पातळी तपासता येते. दुधाचे गुणधर्म मोजल्यानंतर, ते स्क्रीनवर दर्शवले जातात, ज्यामुळे वापरकर्त्याला दुधाची गुणवत्ता सहजपणे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.