Chhatrapati Sambhajinagar. Police: छत्रपती संभाजीनगर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. भरदिवसा, गजबजलेल्या चौकात आणि लोकांच्या डोळ्यांसमोर शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, हा हल्ला अगदी सिनेस्टाईल पद्धतीने करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधी गळाभेट घेत विश्वास संपादन केला आणि काही क्षणांतच थेट गळ्यावर वार करत रक्तरंजित खेळ खेळला गेला.
अंबादास म्हस्के असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवसेना नेत्याचे नाव आहे. ते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शहरातील बाबा पेट्रोलपंप चौक परिसरात हा थरारक प्रकार घडला. आरोपी म्हस्के यांना भेटण्यासाठी आले होते. सुरुवातीला सर्व काही सामान्य सुरू असल्याचे दिसत होते. आरोपींनी अगदी जवळीक दाखवत गळाभेट घेतली. मात्र, पुढच्याच क्षणी त्यांनी धारदार शस्त्र काढत थेट गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. लोकांनी आरडाओरड सुरू केली, तर काहींनी जखमी अवस्थेतील म्हस्के यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
या हल्ल्यामागे नेमकं कारण काय? कोणत्या वादातून हा रक्तरंजित कट रचला गेला? याबाबत पोलिस तपास सुरू आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील स्टाईलने हा हल्ला केल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. आधी मैत्री, मग अचानक हल्ला… या संपूर्ण घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भररस्त्यात राजकीय नेत्यावर असा हल्ला होत असेल तर सामान्य नागरिक किती सुरक्षित? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. संभाजीनगरातील या रक्तरंजित हल्ल्याने राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.