Nashik Kumbh Mela Scam : स्पेलिंगमधील एक चूक अन् कुंभमेळ्यातील मोठा घोळ उघड, आयुक्त गेडामांच्या बनावट सहीने 35 कोटींची वर्कऑर्डर

Fake signature scam commissioner Gedam Nashik: डजिटल स्वाक्षरी व स्पेलिंगमधील चुकीमुळे हा घोळ उघडकीस आला आहे. आयुक्त गेडाम यांनी आपली बनावट सही ओळखली आणि कार्यारंभ आदेश बनावट असल्याचे उघड झाले.
IAS Praveen Gedam
IAS Praveen GedamSarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela scam 35 crore work order: नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार असल्याने सध्या कामांची लगीनघाई सुरु आहे. असे असताना नाशिकचे विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीने ३५ कोटी रुपयांच्या कामांचे बनावट कार्यारंभ आदेश तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कुंभमेळ्यानिमित्त सीसीटीव्ही सर्वेक्षण बसविणे, कार्यान्वित करणे व देखभालीच्या कामांच्या कार्यादेशावर नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी वापरुन त्र्यंबकेश्वर-कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने तब्बल ३५ कोटींच्या कामांची थेट वर्कऑर्डर काढण्यात आली होती.

हा कार्यादेश ‘इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्युशन्स एजन्सी, ठाणे’ या संस्थेच्या नावे तयार करण्यात आला होता. परंतु आयुक्त गेडाम यांनी आपली बनावट सही ओळखली आणि हा धक्कादायक घोळ उघडकीस आला.

याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पडद्यामागचा सूत्रधार कोण हे स्पष्ट होणार असल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे स्वीय सहायक विजय गोरख सोनवणे (रा. गंगापूर रोड) यांनी नाशिकरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे.

IAS Praveen Gedam
Nashik Kumbh Mela : नाशिकच्या कुंभमेळ्यात 12 कोटी भाविकांच्या मदतीसाठी ‘कुंभदूत’ची एंट्री.. CM फडणवीसांचा दृष्टिकोन काय?

दिलेल्या फियार्दीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी नीळकंठ शेवाळे नावाचा व्यक्ती नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आला. त्याने दोन संशयास्पद पत्रांच्या वैधतेबाबत विचारणा केली. ही पत्रे त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेडचे गजानन पाटील-चव्हाण यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

तपासणीदरम्यान, कुंभमेळा प्राधिकरण शाखेचे सहाय्यक संशोधन अधिकारी योगेश सोमवंशी यांना पत्रातील मजकूर, मार्जिन आणि स्वाक्षरीबाबत संशय आला. त्यामुळे सदरची पत्रे त्यांनी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांना दाखविली.

IAS Praveen Gedam
नाशिकच्या कुंभमेळ्यात कुणीच हरवणार नाही, ‘कुंभदूत’ करणार प्रत्येकाला मदत..

‘Pravin’

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्या पत्रांची बारकाईने पाहाणी केली. तेव्हा त्यांच्या इंग्रजीतील नावातील अक्षरांतील चुकीमुळे कार्यादेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आयुक्त गेडाम यांच्या अधिकृत डिजिटल स्वाक्षरीत 'Praveen' असे स्पेलिंग असताना बनावट पत्रांवर ‘Pravin’ असे स्पेलिंग होते. ही बाब डॉ. गेडाम यांच्या नजरेने हेरली ही सही आपली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावरील डिजिटल स्वाक्षरी, कार्यादेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अज्ञात संशयितांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगांने बनावट कार्यादेश तयार करीत शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com