Girish Mahajan Politics: नाशिक कुंभमेळा वर्क ऑर्डर घोटाळा प्रकरणी धक्कादायक अपडेट: संशयित निघाला मंत्री महाजनांचा नातेवाईक

Nashik Kumbh Mela: नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या सुमारे 600 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर दिल्याचे पुढे आले होते. यासंदर्भात सिंहस्थ कुंभमेळा कक्षानेही पोलिसांना चौकशीच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये काही सराईत लोकांनी कंत्राटदारांना गंडवल्याचे स्पष्ट झाले.
Girish Mahajan | Kumbh Mela Fake Work Order Scam
Girish Mahajan | Kumbh Mela Fake Work Order ScamSarkarnama
Published on
Updated on

Kumbh Mela Scam News: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरण पोलिसांनी मोठी कारवाई. यासंदर्भात तीन संशयतांना ताब्यात घेण्यात आले आहे.. जामनेर येथून संशयतांना अटक केल्याने खळबळ उडाली.

नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या सुमारे 600 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर दिल्याचे पुढे आले होते. यासंदर्भात सिंहस्थ कुंभमेळा कक्षानेही पोलिसांना चौकशीच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये काही सराईत लोकांनी कंत्राटदारांना गंडवल्याचे स्पष्ट झाले.

यासंदर्भात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल खुलासा केला होता. या प्रकरणात माझे नाव गोवण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. याबाबत आपला कोणताही थेट संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

याविषयी पोलिसांनी दोन दिवसांपासून तपास सुरू केला होता. मंगळवारी जामनेर येथून तीन संशयतांना नाशिकच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना नाशिक येथे चौकशीसाठी आणण्यात आले आहे.

Girish Mahajan | Kumbh Mela Fake Work Order Scam
Kalaburagi Latur Railway Project : महाराष्ट्र-कर्नाटकच्या वाट्याला 4 हजार 900 कोटींचा अवाढव्य प्रोजेक्ट : दोन्ही राज्यातील खासदारांनी लावली ताकद

कुंभमेळा वर्कऑर्डर घोटाळ्यावर महाजन आक्रमक

अटकेतील आरोपी तनय महाजन हा आपला फार दूरचा नातेवाईक असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. त्याच्यावर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचा दावा त्यांनी केला.

"हा फार गंभीर गुन्हा आहे. नातेवाईक असो किंवा इतर कोणीही असो, कुणालाही सोडायचं नाही. जे जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर आणि कडक कारवाई केली जाईल," अशी भूमिका महाजन यांनी मांडली.

Girish Mahajan | Kumbh Mela Fake Work Order Scam
Ncp News : दिल्लीतून मोठी अपडेट! शरद पवारांच्या खासदारांची महत्त्वाची बैठक; नेमके कारणही आले समोर!

बनावट वर्क ऑर्डरच्या माध्यमातून इतरही प्रकरणांमध्ये फसवणूक झालेली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणात आपण स्वतः तक्रार केली असल्याने कोणाचीही हयगय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, तनय महाजन हा या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात असले तरी आणखी काही मोठी नावे समोर येत आहेत का आणि त्यात मोठ्या रकमेचे व्यवहार झाले आहेत का, याची माहिती तपासातून स्पष्ट होईल, असेही महाजन यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com