Loksabha Election 2024 : महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. अनेक जागांवरील उमेदवार जाहीर झाले असले तरी बऱ्याच जागांवर तोडगा निघालेला नाही. तर काही जागा अशाही आहेत, ज्यावरून महायुतीमधीलच प्रमुख पक्षांमध्ये मतभेद निर्माण होऊन, रस्सीखेच पाहाया मिळत आहे. ही परिस्थिती नाशिक लोकसभा मतदारसघांसाठी दिसत आहे.
कारण, शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी रविवारी शेकडो समर्थकांसह नाशिकहून मुंबईला वाहन ताफा नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाशिक मतदारसंघ शिवसेनेकडेच रहावा यासाठी दबावतंत्र वापरल्याचे दिसून आले. तर मुख्यमंत्री शिंदे यांनीही या जागेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, मतदारसंघ आपल्याकडेच ठेवणार असल्याचे संकेत दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यानंतर तत्काळ भाजपच्या गोटातही हालचाल वाढली आणि मंगळवारी नाशिकमधील भाजपच्या आमदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन, हा मतदारसंघ लोकसभेसाठी भाजपलाच मिळायला हवा, अशी आग्रही भूमिका मांडली. यामुळे आता नाशिक लोकसभा मतदार संघावरून महायुतीमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेत चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना आमदार देवीयानी फरांदे(Devyani Pharande) म्हणाल्या, 'नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपाचे तीन आमदार असून, महापालिकेतील नगरसेवकांची संख्या जवळपास 66 आहे. इतर नगरपालिकांचा विचार केला तरी त्यामध्ये आमचे 25-30 नगरसेवक आहेत. म्हणजे असे एकूण 100 नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. आम्हा सर्वांचं एकमत या बाबत आहे, त्यासाठी आम्ही आज फडणवीसांना भेटलेलो आहोत.'
याशिवाय 'मेरीटचा विचारत करता वरिष्ठांनी याबाबत विचार करावा. अशी आमची मागणी आहे. जर त्यांची ताकद मतदारसंघात अधिक असती तर त्यांना उमेदवारी द्यावी. परंतु जर आज मतदारसंघातील परस्थितीचा विचार केला. भाजपच्या(BJP) ताकदीचा विचार केला, तर सर्वच विषयात भाजप श्रेष्ठ ठरत आहे.' असं फरांदेंनी बोलून दाखवलं.
याचबरोबर 'आम्ही सगळ्यांनी आमच्या भावना फडणवीसांपर्यंत पोहचवल्या आहेत. आमची याविषयावर सखोल चर्चा झाली आहे आणि त्यांनाही हे माहीत आहे की भाजपची ताकद ही नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आहे. जागेची मागणी सर्वजणच करतील परंतु ज्याची ताकद मतदारसंघात आहे, ज्याचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी आहे. त्यांना मिळावी हा आमचा भाजपचा आग्रह आहे. त्यासाठीच आम्ही आज एकत्रितपणे मुंबईला आलो आहोत.' अशी माहिती फरांदेंनी दिली.
तसेच 'आमदार सीमा हिरे, आमदार राहुल आहेर, राहुल ढिकले, दिनकर अण्णा पाटील, केदार आहेर, जिल्हाध्यक्ष अन् नगरसेवक आहे. आम्हाला जर इथे शक्तिप्रदर्शन करायचं असतं तर आम्ही इथे पाच-दहा हजार लोकांना घेऊन येऊ शकतो. जर आम्हाला समर्थन दाखवायचं असले तर आम्ही समर्थकांना घेऊन उतरू शकतो. परंतु ही काही आमची भाजपमधील पद्धत नाही. आम्ही आमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवतो आणि वरिष्ठांनी त्याची दखल घेतलेली आहे.' असंही फरांदे यांनी सांगितलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.