नाशिक लोकसभेच्या ( Nashik Lok Sabha Election 2024 ) जागेवर भाजपने दावा केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता.24) सायंकाळी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या ठाणे येथील घरासमोरच ठिय्या मांडत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास फरांदे यांच्यासह पदाधिकारी शेकडो पदाधिकाऱ्यांनी नाशिकची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी केली. घरासमोर ठिय्या मांडलेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री साडेदहा वाजता भेट घेऊन जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले. तसेच, नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असल्याची शाश्वती त्यांनी या वेळी आंदोलकांना दिली.
खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांनी नाशिकमधील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार गोडसे यांच्या उमेदवारीला थेट विरोध करत पक्ष कार्यालयात नाशिकचा खासदार 'कमळा'चा हवा, असे जणू शिवसेनेला आव्हानच दिले. यानंतर खासदार गोडसे यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
परंतु, भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्यासाठी उशीर होत असल्याचे लक्षात येताच खासदार गोडसे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे ( Dada Bhuse ), आमदार सुहास कांदे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, सह संपर्कप्रमुख सूर्यकांत लवटे, गणेश कदम जयंत साठे, हरीश भडांगे, नितीन खर्जुल, नानू साळवे, कोमल साळवे यांच्यासह सुमारे अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर ठिय्या मांडला.
आमदार सुहास कांदे म्हणाले, "हेमंत गोडसे यांनी दोन वेळा राष्ट्रवादीचे काका व पुतणे यांना पराभूत केले आहे. त्यामुळे ते सक्षम उमेदवार असून, त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी." तर, पालकमंत्री दादा भुसे यांनी हेमंत गोडसेंसाठी थेट रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यामुळे शिवसैनिक आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहेत.
दरम्यान, रात्री साडेदहा वाजेला मुख्यमंत्री शिंदे हे ठिय्या मांडलेल्या आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांच्या भेटीला आले. त्यांनी नाशिकची जागा ही शिवसेनेलाच मिळणार असल्याची ग्वाही दिली. त्यासाठी आपणा सर्वांनी काम करायचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रात्री साधारणत: एक तासभर पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावा लागला.
थेट कार्यकर्ते घरासमोरच ठिय्या मांडून अशा पद्धतीने उमेदवारी मागण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत असल्यामुळे पक्ष नेतृत्वाला आता ठोस भूमिका घ्यावी लागणार असल्याचे या विरोधातून दिसून येते. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेनेला मिळते की, भाजपला याविषयी दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढत चालली आहे.

( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.