Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा लवकरच सुटणार ?

The discussion of Chief Minister Shinde and Boraste is in the bouquet : मुख्यमंत्री शिंदे आणि बोरस्ते यांची चर्चा मात्र गुलदस्तातच..
Eknath Shinde- Ajay Boraste
Eknath Shinde- Ajay BorasteSarkarnama

Nashik News : नाशिक लोकसभा जागेबाबत पुन्हा एकदा शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर या जागेचा तिढा लवकरच सुटणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि बोरस्ते यांच्यात नेमकी चर्चा झाली आहे. हेच गुलदस्तात राहिलेले आहे.

सोमवारी रात्री उशिरा नाशिक शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या ठाणे कोपरी पूर्व येथील चैत्र नवरात्रीच्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. तत्पूर्वी नाशिक लोकसभा जागेचा तिढा सुटत नसताना, एकीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी भेटी गाठी करून चर्चा केलेली आहे. तसेच या जागेसाठी वर्षा आणि ठाण्यातील निवासस्थानी हेमंत गोडसे यांनी शक्तिप्रदर्शन केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde- Ajay Boraste
Congress Lok Sabha Politics: 'बाळासाहेब थोरात यांनी माझे बिन टाक्याचे ऑपरेशन केले'

याच दरम्यान नाशिकच्या (Nashik) जागेसाठी बोरस्ते यांना उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी शिवसैनिकांनी लावून धरलेली आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाशिक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची मध्यरात्री भेट झाली. मुख्यमंत्री आणि बोरस्ते यांच्यामध्ये चर्चा झाली खरी, पण ती नेमकी काय झाली हे गुलदस्तात आहे. मात्र नाशिक लोकसभेचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा, की शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटाचा यावरून अक्षरशः राजकीय धमासान सुरू आहे. दोन्हीही पक्षांचे वरिष्ठ नेते आपला दावा सोडण्यास तयार नाहीत. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नाशिक मतदारसंघ अजित पवार गटालाच मिळाला पाहिजे. त्यावर आमचा हक्क आहे, असा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासाठी पक्षाला हा मतदारसंघ पाहिजे आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी विद्यमान खासदार आमचाच आहे. त्यामुळे हा मतदारसंघ इतरांना देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. या मतदारसंघासाठी आम्ही सर्व प्रतिष्ठा पणाला लावू, असा इशारा दिलेला आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Eknath Shinde- Ajay Boraste
Sharad Pawar News : लेकीसाठी आठ, धैर्यशीलसाठी सहा, लाडक्या शशिकांतसाठी पाच; पवारांचा झंझावात!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com