Nashik Lok Sabha Seat : भाजपची नाशिक लोकसभेसाठी शिंदे गटावर कुरघोडी? हक्काची जागा असताना...

Nashik Lok Sabha Seat Struggle : राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी होणार कार्यकारिणी सभा
Nashik Lok Sabha Seat :
Nashik Lok Sabha Seat :Sarkarkarnama
Published on
Updated on

Nashik News : आगामी वर्षाच्या एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेकडे असली तरी भारतीय जनता पक्ष देखील या मतदारसंघातून उमेदवार उभा करण्यासाठी ‘खेळपट्टी’ तयार करत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी (ता. १६) पक्षाच्या कार्यकारिणीची होणारी जाहीर सभा हा त्याचाच एक भाग मानला जात आहे. (BJP may trying to screw up on Shinde group for Nashik Loksabha constituency)

भाजप (BJP) नेते जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या एक दिवसाच्या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर दर्शन ते आरोग्य व क्रीडा क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तींच्या भेटीतून सामाजिक कानोसा देखील घेतला जाणार आहे. त्यामुळे शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी शिंदे गटात प्रवेश करून मोदी सरकारला पाठिंबा दिला असला तरी, भाजप (BJP) त्यांच्यावर कुरघोडी करण्याच्या विचारात दिसत आहे.

Nashik Lok Sabha Seat :
Municipal elections : महापालिका निवडणुका आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतरच?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र चूल मांडत महाविकास आघाडीची कास धरली. शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला व निवडणूक आयोगाने देखील त्या गटाला मान्यता देत शिवसेनेचे चिन्ह शिंदे यांच्या गटाकडे सोपविले.

राज्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या राजकीय घटनांचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर निश्चितच होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यादृष्टीने भारतीय जनता पक्षाने एकला चलो रे ची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाची युती होईल की नाही हे निवडणूक जवळ येईल तसे समोर येईलच.

Nashik Lok Sabha Seat :
Ram Shinde Death Threat: मोठी बातमी! राम शिंदेंना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मध्य प्रदेशातून अटक

अगदी गाफीलपणाचा भाग नको म्हणून भारतीय जनता पक्षाने राज्यात ४५ लोकसभा व दोनशे विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी केली आहे. त्याच अनुषंगाने येत्या १६ जूनला ठक्कर डोम येथे भारतीय जनता पक्षाच्या नाशिक कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे संबोधित करणार असून त्यांच्या भाषणाने या कार्यकारिणीचा समारोप होईल.

अध्यक्ष नड्डा यांचा हा नियमित दौरा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या यशस्वी कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी बैठक होत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात लोकसभेसाठी खेळपट्टी तयार करण्यासाठीच नड्डा हे नाशिकच्या मैदानात उतरून प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे बोलले जात आहे.

Nashik Lok Sabha Seat :
Congress News : राज्यातील '२१ लोकसभा मतदारसंघात' पक्षाला सकारात्मक वातावरण; काँग्रेसचा दावा...

दिनकर पाटील यांचा पर्याय :

नाशिक लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून देखील अनेकांनी तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या आचार संहितेनुसार माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या व्यतिरिक्त अन्य इच्छुकांनी उघड भूमिका घेतलेली नाही. पक्ष संघटनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी पाटील यांना शब्द दिल्याने लोकसभेसाठी त्यांनी उघडपणे तयारी सुरू केली आहे.

नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघासह इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, सिन्नर व नाशिक तालुका भागात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून दिनकर पाटील काम करत आहे. या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे जाळे त्यांनी निर्माण केले आहे. त्यामुळे शंभर टक्के ते निवडणूक लढणारच अशी परिस्थिती आहे. पाटील यांची तयारी लक्षात घेता भाजपकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीकडून देखील त्यांना उमेदवारी देण्याची तयारी आहे.

Nashik Lok Sabha Seat :
Akshay Bhalerao Killing Case: अक्षय भालेरावच्या खून्यांवर कठोर कारवाई करा; आंबेडकरी जनतेचा धडक मोर्चा

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून नाशिक लोकसभेची जागा लढवली जाईल. राष्ट्रवादीकडून सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे तर मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे. कोकाटे हे मविप्रच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याने त्यांचा दावा कमजोर झाला आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा नाशिक लोकसभेवर भक्कम दावा आहे. मात्र, त्यांच्याकडे दमदार असे नेतृत्व नाही. जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे लोकसभेसाठी दावेदार होऊ शकतात, मात्र त्यांचे कार्यक्षेत्र भगूर व नाशिक तालुक्यापुरते मर्यादित असल्याने ते कुठपर्यंत लढत देऊ शकतील याबाबत ठाकरे शिवससेनेच्या पदाधिकाऱ्यांना साशंकता आहे. त्यामुळेच पूर्ण तयारीनिशी लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या पाटील यांच्यावर महाविकास आघाडी कडून जाळे फेकले जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com