Shantigiri Maharaj News : गुन्हा दाखल झाल्यानंतर शांतिगिरी महाराजांचा थयथयाट; म्हणाले,'पैसा- दारू वाटणाऱ्यांना सोडलं अन्...'

Shantigiri accused police and Shivsena Shinde Group on code of conduct violation : मी जे काही केले ते मुद्दाम केलेले नाही. तरीही पोलीस आणि मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी त्या प्रकाराचा बाऊ केला आहे. मात्र त्याच वेळेस सर्रास दारू वाटली जात आहे. पैसे वाटले जात आहेत. त्या ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली नाही. कोणताही गुन्हा दाखल होत नाही.
Shantigiri Maharaj
Shantigiri Maharaj Sarkarnama

Nashik Constituency News : अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यावर सोमवारी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे ते संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट पोलीस प्रशासन आणि सत्ताधारी महायुतीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. शांतिगिरी महाराज यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक मतदार संघात सर्रास आचारसंहितेचे उल्लंघन होताना दिसत आहे. गैरप्रकार घडत आहेत त्याकडे प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले, मी कोणत्याही आचारसंहितेचा भंग केलेला नाही. मी मतदान यंत्राला हार घातलेलं नाही. मतदान यंत्राच्या बाहेर असलेल्या खोक्यावर भारत मातेची प्रतिमा आहे. त्यामुळे त्या प्रतिमेला मी हार घातला. या छोट्याशा प्रकाराने आचारसंहितेचे उल्लंघन होते, हे मला माहित नाही. कोणीही आतापर्यंत तसा नियम असल्याचे मला सांगितलेले नाही. त्यामुळे माझ्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा हे एक षडयंत्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shantigiri Maharaj
Lok Sabha Election 2024 Voting : नाशिक, दिंडोरीत महायुतीला 'कांदा'रडवणार? कांद्याच्या माळा घालून शेतकरी मतदान केंद्रावर

'मी जे काही केले ते मुद्दाम केलेले नाही. तरीही पोलीस (Police) आणि मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी त्या प्रकाराचा बाऊ केला आहे'. मात्र त्याच वेळेस सर्रास दारू वाटली जात आहे. पैसे वाटले जात आहेत. त्या ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली नाही. कोणताही गुन्हा दाखल होत नाही. मात्र माझ्यासारख्या साधूने भारत मातेच्या प्रतिमेला हार घातला म्हणून गुन्हा दाखल केला जातो, हे अतिशय खेदजनक आहे, असेही शांतिगिरी महाराज म्हणाले.

शांतिगिरी महाराज यांच्या काही अनुयायांनी भगवे वस्त्र धारण करून व त्यावर शांतिगिरी महाराज यांचे निवडणूक (Election) चिन्ह लावले. त्यामुळे देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, आपल्या देशात लोकशाही आहे. कोणी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत हे ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे. काही भक्तांनी जर भगवी वस्त्र घातली तर तो गुन्हा कसा?. प्रशासनाचा हा सर्व प्रकार पाहून मला आश्चर्य वाटत आहे.

सोमवारी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत अनेक ठिकाणी गैरप्रकार घडल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर खुद्द शांतिगिरी महाराज यांनीही प्रशासन, पोलीस आणि सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांवर कडक ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे नाशिकची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Shantigiri Maharaj
Arvind Kejriwal Death Threat : 'दिल्ली सोडून जा अन्यथा...', अरविंद केजरीवाल यांना जीव मारण्याची धमकी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com